गेल्या काही दिवसापासून सोन्याच्या दरात सातत्यानं वाढ होत आहे. त्यामुळं सोनं खरेदी करावं की नको असा सवाल नागरीकांमधून उपस्थित केला जात आहे. आज पुन्हा सोन्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे. गेल्या 2 दिवसात सोन्याच्या दरात तब्बल 900 रुपयांची वाढ झाली आहे. दोन दिवसात सोन्याचे दर 75900 वरुन 76800 वर हे दर पोहोचले आहेत. विशेष म्हणजे हा दर जी एस टी सोडून आहे.
आज जळगावच्या सराफा बाजारात सोन्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे. दोन दिवसात सोन्याचे दर तब्बल 900 रुपयांनी वाढले आहेत. सध्या जीएसटी सोडून सोन्याचा दर हा प्रतितोळा 76800 रुपयांवर पोहोचला आहे. दुसीरकडे नागपूरमध्ये देखील प्रतितोळा सोन्याचा दर हा 76800 रुपयांवर पोहोचला आहे. हा दर 24 कॅरेट सोन्याचा आहे. तर 22 कॅरेट सोन्याचा दर हा 71400 रुपयांवर गेला आहे.