सुप्रीम कोर्टात न्याय देवतेची नवीन मूर्ती लावली गेली आहे. न्यायाधीशांच्या लायब्ररीमध्ये लावण्यात आलेल्या नव्या मूर्तीचे वैशिष्ट्ये आहे की, या मूर्तीच्या डोळ्यावर पट्टी बांधलेली नाही. आधीप्रमाणेच या मूर्तीच्या हातात तराजू आहे, मात्र दुसऱ्या हातात तलवारीच्या जागी भारताचे संविधान आहे.
प्रतिकात्मक दृष्टीने पाहिले तर काही महिन्यांपूर्वी बसवण्यात आलेली न्यायदेवतेचा नवीन पूतळा हा न्याय आंधळा नसतो असा स्पष्ट संदेश देत असल्याचं सांगितलं जातंआहे. सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांच्या पुढाकाराने हा पुतळा बसवण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. मात्र असे पुतळे कोर्टरुममध्ये तसेच आणखी काही ठिकाणी बसवणार की नाही, हे काही स्पष्ट झालेलं नाही.
न्यायदेवतेच्या या नव्या पुतळ्याचा रंग पूर्णपणे पांढरा आहे. पुतळ्यामध्ये न्यायदेवतेचे भारतीय पोशाखात चित्रण करण्यात आले आहे. न्यायदेवतने साडी परिधान केल्याचे सांगितले आहे. डोक्यावर मुकुट आहे. कपाळावर टिकली, कानात आणि गळ्यात पारंपरिक दागिनेही दिसतात. न्यायदेवतेच्या एका हातात तराजू आहे. दुसऱ्या हातात संविधान धरलेले दाखवले आहे.
खरे तर न्यायाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या न्यायालयांमध्ये ठेवलेल्या पुतळ्याला’लेडी जस्टिस’म्हणून ओळखले जाते. आतापर्यंत वापरल्या जाणाऱ्या न्यायदेवतेच्या डोळ्यावर काळी पट्टी होती. आता ती हटवण्यात आली आहे.