आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटाकडून मंगळवारी रात्री 45 उमेदवारांची पहिली यादी प्रसिद्ध करण्यात आली. ही यादी प्रसिद्ध झाल्यानंतर आता शिंदे गटात बंडाचे पहिले निशाण फडकले आहे. बुलढाणा विधानसभा मतदारसंघातील इच्छूक प्रेमलता सोनावणे यांनी उमेदवारी न मिळाल्यामुळे अपक्ष लढणार असल्याचे जाहीर केले आहे.

काल रात्री शिवसेनेची उमेदवारांची यादी जाहीर झाली होती. यामध्ये बुलढाण्यातून शिंदे गटाचे फायरब्रँड संजय गायकवाड यांना उमेदवारी मिळाली तर मेहकर मधून डॉक्टर संजय रायमुलकर यांना उमेदवारी जाहीर झाली आहे . बुलढाणा जिल्हा हा राजमाता जिजाऊंचा जिल्हा आहे आणि त्यामुळे बुलढाणा मतदारसंघ हा शिंदेंच्या शिवसेनेने महिलांसाठी राखीव ठेवावा अशी सुरुवातीपासूनच मागणी करत शिंदेंच्या शिवसेनेच्या महिला नेत्या प्रेमलता सोनवणे यांनी बंडाचे निशाण फडकवलं होते. मात्र, पक्षाने त्यांची दखल न घेतल्याने आता त्यांनी पक्षाविरोधातच बंडखोरी करण्याचं ठरवलं असून त्या आता शिवसेनेचे विद्यमान संजय गायकवाड यांच्या विरोधात बुलढाणा विधानसभा मतदारसंघातून स्वतंत्र लढणार असल्याची घोषणा त्यांनी केली आहे. विशेष म्हणजे काल वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्र्यांनी त्यांचे भेट नाकारल्याने त्यांनी या घटनेचा निषेधही केला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *