कॉमेडियन कपिल शर्मा सध्या त्याच्या आगामी नेटफ्लिक्स सीरिज ‘द ग्रेट इंडियन कपिल शर्मा शो’च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. गोविंदा, शक्ती कपूर आणि चंकी पांडे यांच्यानंतर आता बॉलिवूडची सदाबहार अभिनेत्री रेखा कपिलच्या शोच्या पुढच्या एपिसोडमध्ये दिसणार आहे. रेखा येताच कपिलचा शोला चार चाँद लागले आहेत. आता रेखा जर एखाद्या ठिकाणी असेल तर तेथे अमिताभ बच्चन यांचा उल्लेख होणार नाही असे होणार नाही. कपिल शर्मा शोमध्ये देखील असेच काहीसे घडले आहे. या शोमधील एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
‘द ग्रेट इंडियन कपिल शर्मा शो’मध्ये रेखा कपिलसोबत धमाकेदार एन्ट्री करते. यावेळी रेखाने पुन्हा एकदा आपल्या लूकने सर्वांची मने जिंकली आहेत. रेखाने गोल्डन कलरच्या साडीसोबत लाल रंगाचा ब्लाउज परिधान केला आहे. त्याचबरोबर दागिने आणि केसात गजरा माळून सौंदर्यात भर घातली आहे. रेखा एन्ट्री करताच म्हणते की, ‘माझे वय ७० वर्षे आहे. मी १७ वर्षांची दिसत आहे हे तुम्ही ऐकले आहे.” हे ऐकून सगळ्यांनाच हसू अनावर झाले आहे.
‘द ग्रेट इंडियन कपिल शर्मा शो’चा प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या प्रोमोमध्ये दाखवण्यात आले आहे की, कपिल शर्मा रेखासमोर अमिताभ बच्चन यांच्या क्विझ शो ‘कौन बनेगा करोडपती’चा उल्लेख करतो. तो म्हणतो, ‘जेव्हा आम्ही बच्चन साहेबांसोबत केबीसी खेळत होतो आणि माझी मम्मी समोर बसली होती. तेव्हा त्यांनी मम्मीला विचारले की, ‘देवीजी, तुम्ही काय खाल्ले आपण?’ त्यावर मम्मी लगेच म्हणाली की, पाजी दाल-रोटी. हे ऐकून रेखा हसू लागते. यानंतर रेखा कपिलला चिडवते आणि म्हणते, ‘मला विचारा, त्यांचा एक एक डायलॉग मला आठवतो.’
कपिलचं बोलणं संपताच रेखाने त्याला सांगितलं की, मला हे सगळं ऐकून एक शेर आठवत आहे आणि माझ्या मनात काय सुरु आहे हे मी सांगते. रेखा म्हणाली, ‘कुछ तो मिरे पिंडर-ए-मोहब्बत का भरम रख, तू भी तो कभी मुझ को राजी के लिए आआ.’ रेखाचा हा शेर ऐकून सर्वांना हसू अनावर झाले आहे. याशिवाय कृष्णा अभिषेक, किकू शारदा यांनी या शोमध्ये आपल्या अभिनयाने सर्वांचे मनोरंजन केले.