Breaking News

डी गुकेश बनला वर्ल्ड चॅम्पियन!

भारताचा बुद्धिबळपटू डी मुकेश याने बुद्धिबळातील वर्ल्ड चॅम्पियनशिपचे विजेतेपद जिंकून इतिहास रचला आहे. डी मुकेश हा वर्ल्ड चॅम्पियन बनणारा सर्वात तरुण बुद्धिबळपटू ठरला आहे. विश्वनाथ आनंदनंतर अशी कामगिरी करणारा हा दुसरा भारतीय बुद्धिबळपटू आहे. अंतिम सामन्यात गुकेशने चीनचा खेळाडू डिंग लिरेनवर मात केली.

डी गुकेश याने सिंगापूरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या बुद्धिबळातील वर्ल्ड चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात चीनच्या डिंग लिरेनला चेकमेट दिला. डी गुकेशने 14 डावांनंतर साडे सात आणि साडे सहा अशा फरकाने पराभव केला. डी गुकेश हा केवळ 18 वर्षांचा असून तो जगातील सर्वात तरुण वर्ल्ड चॅम्पियन बनला आहे. यापूर्वी गॅरी कास्पोरोव्ह याने असा विक्रम केला होता. यापूर्वी 2012 मध्ये भारताचे बुद्धिबळपटू विश्वनाथन आनंद यांनी वर्ल्ड चॅम्पियनशिप जिंकली होती.

अंतिम सामन्यात भारताच्या डी गुकेशने चीनच्या डिंग लिरेनला चेकमेट देऊन ही स्पर्धा जिंकली. यावेळी चीनच्या डिंग लिरेनला चेकमेट दिल्यावर गुकेश भावुक झाला आणि त्याला आपले आनंदाश्रू आवरता आले नाहीत. सध्या याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतं आहे.

वर्ल्ड चॅम्पियन ठरलेल्या डी गुकेशचा जन्म 29 मे 2006 रोजी चेन्नई येथे एका तेलुगू कुटुंबात झाला. त्याचे पूर्ण नाव डोम्माराजू गुकेश आहे. त्याचे वडील डॉ. रजनीकांत हे कान-नाक आणि घसा सर्जन आहेत, तर आई पद्मा सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ आहे. वयाच्या सातव्या वर्षी डी गुकेश तो बुद्धिबळ खेळायला शिकला. डी गुकेशने वयाच्या 12 व्या वर्षी ग्रँडमास्टर विजेतेपद पटकावले आणि बुद्धिबळाच्या इतिहासातील तिसरा सर्वात तरुण ग्रँडमास्टर ठरला. त्यानंतर त्याने आशियाई क्रीडा स्पर्धेतही त्याने रौप्यपदक पटकावलं होतं. गुकेशने याआधी वयाच्या 17 व्या वर्षी FIDE ही मानाची बुद्धिबळ स्पर्धाही जिंकली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *