या आठवड्यात कौन बनेगा करोडपती 16 चा अमिताभ बच्चन यांच्या अद्भुत सूत्रसंचालनातील एक भाग
खरोखर अविस्मरणीय होणार आहे. यावेळी हॉटसीटवर असतील कानपूर, उत्तर प्रदेशातून आलेले प्रवीण
नाथ, जे पाटबंधारे विभागातील कर्मचारी आहेत. प्रवीण नाथ यांच्या हॉटसीटपर्यंतच्या प्रवासातून त्यांची
जिद्द, धडाडी आणि संधीचा सदुपयोग करण्याचे कसब दिसते. त्यांची कहाणी ऐकून प्रेक्षक नक्कीच प्रेरित
होतील.
या भागात, हलक्या फुलक्या गप्पा मारताना अमिताभ बच्चन यांनी कानपूरची आणि तिथल्या रुचकर
खाद्यपदार्थांची आठवण काढली आणि त्या संदर्भात अभिषेक बच्चनविषयीची एक रोचक गोष्ट सांगितली.
बिग बींनी प्रवीणला विचारले, “तुमच्या मते तिकडच्या पदार्थांची खासियत काय आहे?” त्यावर प्रवीण
यांनी उत्साहाने सांगितले की ठग्गू के लड्डू खूप प्रसिद्ध आहेत. आणि बंटी और बबलीचे शूटिंग
कानपूरला झाले होते. प्रवीण यांनी पुढे सांगितले की, ते त्यावेळी शूटिंग बघायला गेले होते, पण त्यांना
पुढे जाऊ देत नव्हते आणि त्यांना जेमतेम काही हालचाली दिसल्या होत्या.
अमिताभ बच्चन म्हणाले, “अगदी बरोबर. मी आत्ता तेच सांगणार होतो. बंटी और बबलीचे शूटिंग तिकडेच
झाले होते. अभिषेकने ते लोकेशन निवडले होते, कारण त्यामुळे त्याला तिथले लाडू पुन्हा पुन्हा खाण्याची
संधी मिळणार होती! हे लाडू जिथे बनवले जातात, त्या दुकानाच्या समोरच शूटिंग करण्यात आले होते.
अभिषेकला ते लाडू फारच आवडतात. त्या शूटिंगच्या वेळी काम करणाऱ्या सगळ्यांनाच कानपूरचे ते
प्रसिद्ध लाडू हवे असायचे.”
त्यानंतर प्रवीणने आपल्या शालेय दिवसांतील एक आठवण सांगितली. त्यावेळी अमिताभ बच्चन यांचा हम
चित्रपट रिलीज झाला होता. प्रवीण यांनी अमिताभ बच्चन यांच्या एका छायाचित्रासकट श्री. बच्चन यांना
एक पत्र पाठवले होते. आणि त्यांना आश्चर्य वाटले होते की, त्या छायाचित्रावर स्वाक्षरी करून श्री. बच्चन
यांनी ते छायाचित्र परतही पाठवले होते. ही आठवण प्रवीण यांच्या मनात कायमसाठी घर करून राहिली.
अमिताभ बच्चन सोबतचे असेच अनेक हलके-फुलके आणि हृदयस्पर्शी क्षण अनुभवा कौन बनेगा करोडपती
16 मध्ये दर सोमवार ते शुक्रवार रात्री 9 वाजता फक्त सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर!