Breaking News

जर्मनीतील ख्रिसमस मार्केटवर प्राणघातक कार हल्ला, सौदीच्या डॉक्टरला अटक

जर्मनीतील मॅग्डेबर्ग शहरातील ख्रिसमस मार्केटमध्ये एका व्यक्तीने खरेदी करत असलेल्या लोकांवर हल्ला करत कारने उडवले. यामध्ये एका लहान मुलासह दोघांचा मृत्यू झाला आहे. याचबरोबर ६० हून अधिक लोक जखमी झाल्याचे समोर आले आहे. यामध्ये १५ जण गंभीर जखमी झाले आहेत. दरम्यान जर्मन पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हा अपघात नसून, ठरवून केलेला हल्ला आहे. हा हल्ला शुक्रवारी सायंकाळी सातच्या सुमारास झाला आहे. दरम्यान पोलिसांनी मृतांची संख्या वाढू शकते अशी माहिती दिली आहे.

सॅक्सोनी-अनहॉल्ट राज्याचे पंतप्रधान रेनर हॅसेलॉफ यांनी दिलेल्या माहितीनुसार, हल्लेखोर कार चालकाला ताब्यात घेण्यात आले आहे. हॅसेलॉफ म्हणाले की, “प्राथमिक माहितीवरून असे दिसते की, चालकाने एकट्याने हा हल्ला केला आहे. त्याला अटक केल्यामुळे शहराला आता कोणताही धोका नाही.

काय असतात ख्रसमस मार्केट्स?

मॅग्डेबर्ग शहर सॅक्सोनी-अनहॉल्ट राज्याची राजधानी आहे. या शहराची अंदाजे २४०,००० इतकी लोकसंख्या आहे. आठ वर्षांपूर्वी जर्मनीची राजधानी बर्लिनमध्ये अशीच एका घटना घडली होती. त्यावेळी एका ट्रकने ख्रिसमस मार्केटमध्ये १३ जणांना चिरडले होते.

ख्रिसमस मार्केट ही जर्मनीतील अनेक वर्षांपासून चालत आलेली परंपरा आहे. दरवर्षी लाखो लोक ख्रिसमच्या खरेदीसाठी त्याकडे आकर्षित होतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *