भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या धर्मपत्नी, त्यागमूर्ती माता रमाबाई आंबेडकर यांची जयंती राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुंबई येथील मुख्य कार्यालयात त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून साजरी करण्यात आली.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे कोषाध्यक्ष आमदार शिवाजीराव गर्जे, मुंबई कार्याध्यक्ष सिद्धार्थ कांबळे, प्रदेश प्रवक्ते संजय तटकरे, प्रदेश उपाध्यक्ष बाप्पा सावंत, प्रदेश सरचिटणीस लतिफ तांबोळी, सहकोषाध्यक्ष संजय बोरगे, दक्षिण मुंबई जिल्हाध्यक्ष महेंद्र पानसरे आदींसह पक्षाचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.