महाकुंभ मेळाव्यात संकटाची मालिका थांबायचे नावच घेत नसल्याचे दिसत आहे. उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथील महाकुंभात पुन्हा आग लागल्याचे वृत्त आहे. ही आग सेक्टर १९ च्या तंबूंना लागली आहे. येथे कल्पवासी राहतात.सुदैवाने ते निघून गेल्यानंतर रिकाम्या असलेल्या या तंबूंना अचानक आग असून ही आग पसरली जाऊन अनेक तंबू आगीत जळून गेले आहेत. विकेण्डमुळे महाकुंभमध्ये पर्यटकांची मोठी गर्दी असून स्नानासाठी घाटांवर गर्दी असताना ही घटना घडल्याने अफरातफारी माजली आहे.
महाकुंभमध्ये तिसऱ्यांदा आग लागण्याची घटना घडली आहे. या ताज्या आगीमुळे उत्तर प्रदेश सरकार अडचणीत सापडले आहे. या आधी देखील तीन वेळा आग लागली. तर एकदा या मौनी अमावस्येच्या स्नानाच्या दरम्यान चेंगराचेंगरी होऊन सुमारे ३० जणांचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडली होती. या वरुन उत्तर प्रदेश सरकारवर टीका झाली होती.
विकेण्ड निमित्ताने लाखो भाविक महाकुंभात आल्याने मोठी गर्दी उसळली आहे. सकाळपासूनच मोठ्या संख्येने भाविक गंगेत स्नान करीत आहेत. विकेण्डची संभाव्य गर्दी लक्षात घेऊन महाकुंभमध्ये वाहनांचा प्रवेश रोखण्यात आला होता. प्रयागराजच्या सर्व सीमांवर बाहेरून येणारी वाहने रोखण्यात आली असून तेथून भाविकांना पायी चालत किंवा स्थानिक वाहनांनी यावे लागत आहे.
ही आग संपूर्णपणे नियंत्रणात आहे. सेक्टर १९ मध्ये कल्पवासींच्या रिकाम्या तंबूंना ही आग लागली होती. कल्पवासींनी हे तंबू रिकामे केले होते. त्यात कोणीही राहत नव्हेत त्यामुळे सुदैवाने कोणतीही जीवितहानी किंवा दुखापत झालेली नाही असे महाकुंभाचे डीआयजी वैभव कृष्ण यांनी सांगितले.
महाकुंभात आग लागण्याची ही काही पहिली घटना नाही. गेल्या २८ दिवसांत जत्रा परिसरात आगीची ही चौथी घटना आहे. जत्रेच्या परिसरात आगीची पहिली घटना १९ जानेवारी रोजी घडली होती. त्यावेळी सेक्टर १९ मधील गीता प्रेस कॅम्पमधील अनेक तंबू जळून खाक झाले होते. यानंतर ३० जानेवारी रोजी सेक्टर २२ मध्ये आग लागली, ज्यातही डझानहून अधिक तंबू जळाले होते. ७ फेब्रुवारी रोजी सेक्टर-१८ मध्ये आग लागली ज्यामध्ये अनेक मंडप जळून खाक झाले. मौनी अमावस्येला चेंगराचेंगरीत ३० हून अधिक भाविक ठार झाले होते.