टीम इंडियाने चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ च्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. दुबईत खेळल्या गेलेल्या पहिल्या उपांत्य फेरीत भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाचा ५ विकेट राखून पराभव करत सलग तिसऱ्यांदा अंतिम फेरीत धडक मारली. टीम इंडियाच्या विजयाचे हिरो मोहम्मद शमी आणि विराट कोहली ठरले. तर विराट कोहली सामन्याचा सामनावीर ठरला आहे.
विराट कोहलीच्या ८४ धावा, विराट-श्रेयसची ९४ धावांची भागीदारी, हार्दिकचे दोन षटकार आणि राहुलच्या विजयी षटकारासह भारताने ऑस्ट्रेलियाकडून आयसीसी स्पर्धांच्या पराभवाचा बदला घेत दणदणीत विजय नोंदवला आहे. भारताने उत्कृष्ट फलंदाजी आणि गोलंदाजीसह ऑस्ट्रेलियाला नमवत शानदार विजय मिळवला आहे. यासह भारताने ऑस्ट्रेलियावर ४ विकेट्सने मोठा विजय मिळवत अंतिम फेरीत धडक मारली आहे.
ऑस्ट्रेलियाने भारताला विजयासाठी २६५ धावांचे आव्हान दिले होते. धावांचा पाठलाग करताना भारताने सुरूवातीला २ विकेट्स गमावले होते. पण नंतर विराट कोहली आणि श्रेयस अय्यरने ९८ धावांची भागीदारी करत संघाचा डाव सावरला. यासह भारताला सामन्यात कायम ठेवलं. विराट कोहली पाच चौकारांसह ९८ चेंडूत ८४ धावा करत बाद झाला. विराटने उत्कृष्ट फलंदाजी करत सर्वाधिक धावा एकेरी धाव घेत काढल्या आणि ऑस्ट्रेलियावर दबाव वाढवला. तर श्रेयस अय्यरने ४५ धावांची खेळी केली. तर अक्षरने २७ धावांची खेळी केली. तर हार्दिकने अखेरच्या षटकांमध्ये शानदार ३ षटकार आणि एक चौकार लगावत संघाचा विजय सोपा केला आणि २८ धावांची खेळी करत बाद झाला. तर केएल राहुल ४२ धावा करत नाबाद परतला.
तत्पूर्वी, ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. कांगारू संघाकडून कर्णधार स्टीव्ह स्मिथ आणि ॲलेक्स कॅरी वगळता इतर कोणत्याही फलंदाजाला मोठी खेळी करता आला नाही. स्टीव्ह स्मिथने ९६ चेंडूत ७३ धावांची खेळी केली, तर ॲलेक्स कॅरीनेही ५७ चेंडूत ६१ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. भारताच्या गोलंदाजांनी कायम भारताला सामन्यात ठेवत संघाच्या विजयाच्या पाया रचला.