kshitijmagazine&news

Welcome to Kshitij World. You will find here worlds update and basic information of various things

पेहेलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांचा पहिला फोटो समोर ; हातात AK-47

जम्मू-काश्मीरमधील पेहेलगाम येथे मंगळवारी दुपारी भीषण दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यात 26 पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. पेहेलगाम येथे दहशतवादी हल्ला करणाऱ्या एका अतिरेक्याचा फोटो समोर आला आहे. घटनास्थळावरचा हा फोटो आहे. या दहशतवाद्याच्या हातात बंदूक दिसत आहे. फोटोमध्ये दहशतवाद्याचा चेहरा दिसत नाहीय. पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवाद्यांच्या शोधसाठी सर्च ऑपरेशन सुरु आहे. NIA ची टीम श्रीनगमरध्ये पोहोचली आहे. फॉरेन्सिक टीम सुद्धा दाखल झाली आहे. आर्मी, सीआरपीएफ, एसओजी, जम्मू पोलिसांनी संपूर्ण परिसराला घेराव घातला आहे. हेलिकॉप्टर आणि ड्रोनच्या सहाय्याने दहशतवाद्यांचा शोध सुरु आहे. सीआरपीएफ आणि जम्मू-काश्मीर पोलीस मुगल रोडवर तैनात आहेत. दरम्यान सुरक्षा यंत्रणांकडून पेहेलगाम हल्ल्यातील तीन दहशतवाद्यांच स्केच जारी करण्यात आलं आहे.

पेहेलगाममध्ये सुरक्षा पथकांच ऑपरेशन संपल्यानंतर एनआयएची टीम लोकेशवर पोहोचली आहे. पेहेलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या पर्यटकांचे मृतदेह पहलगाम हॉस्पिटलमधून श्रीनगरला पाठवण्यात आले आहेत. पहलगामच्या बैसारन खोऱ्यात हा हल्ला झाला. यात लोकांना निवडून-निवडून लक्ष्य करण्यात आलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *