जगभरात ज्या गोष्टी घडत आहेत त्याचा परिणाम प्रतिक्रिया म्हणून येत असून व्यापार युद्ध आणि जगभरातील राजकीय संघर्षाच्या मुद्यांमुळं सोन्याचे दर अपेक्षेपेक्षा जास्त वाढले आहेत. भारतात सोन्याच्या दरांनी गेल्या आठवड्यात 1 लाखांचा टप्पा पार केला होता, त्यानंतर दरांमध्ये थोडीशी घसरण झाली होती. काही संस्थांकडून सोन्याचे दर पुढच्या वर्षापर्यंत 1 लाख 6 हजार रुपयांपर्यंत राहतील, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मात्र, एका कंपनीनं भारतात सोन्याचे दर 70 हजार रुपयांवर येतील असा दावा केला आहे. म्हणजेच सोन्याचे दर 27000 रुपयांनी घसरतील.
कझागिस्तानमधील सोन्याच्या खाणकामातील नामांकित कंपनी सॉलिडकोर रिसोर्सेसचे सीईओ विटाली नेसिस यांनी एक मोठा आणि आश्चर्यचकीत करणारा दावा केला आहे. त्यांच्या मते पुढील 12 महिन्यांमध्ये सोन्याच्या दरात मोठी घसरण पाहायला मिळेल. विटाली यांनी रॉयटर्सला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं की पुढील वर्षात सोनं 2500 डॉलर प्रति औंसवर आलेले असतील. सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर 3319 डॉलर प्रति औंस इतके आहेत. विटाली नेसिस यांच्या मते सोन्याचे दर 25 टक्क्यांनी घसरतील.
सॉलिड कोर रिसोर्सेस पीएलसी यापूर्वी पॉलीमेटल म्हणून ओळखली जायची. या कंपनीचं मुख्यालय कझागिस्तान येथे आहे. सॉलिड कोर रिसोर्सेस ही कंपनी आंतरराष्ट्रीय बाजारात लिस्ट असलेली मोठी कंपनी आहे. सॉलिड कोर रिसोर्सेस पीएलसी ही कझागिस्तानमधील सर्वात मोठी दुसऱ्या क्रमांकाची कंपनी आहे. विटाली नेसिस यांच्या अनुभवानुसार,काही अंदाज वर्तवण्यात आले. सोने दरातील तेजी किती दिवस चालू राहील याचा अंदाज घ्यायला हवा. सोने दरातील सध्याची तेजी टिकाऊ नाही. गुंतवणूक दार सुरक्षित पर्याय म्हणून सोने खरेदीला प्राधान्य देत आहेत.
2025 मध्ये सोन्याचे दर 26 टक्क्यांनी वाढले आहेत. कारण अमेरिका विविध देशांवर टॅरिफ लादला आहे. सध्या ट्रम्प यांनी परस्पर शुल्क आकारणीला स्थगिती दिली आहे. त्यामुळं सोन्यातील गुंतवणूक वाढत आहे.
सोने दरात तीन दिवसांपासून घसरण सुरु आहे. एमसीएक्सवर सोनं 4300 रुपयांनी स्वस्त होऊन 95073 रुपयांवर आलं आहे. विटाली नेसिस यांच्या अंदाजानुसार सोन्याचे दर पुढील 12 महिन्यात 25 टक्क्यांनी घसरु शकतात.
Leave a Reply