“अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली अश्लीलतेला मोकळं रान देणं थांबवा!”एजाज खानच्या ‘हाऊस अरेस्ट’ शो वर बंदी घाला, अशी मागणी भाजपच्या विधानपरिषदेच्या आमदार चित्रा वाघ यांनी केली आहे. चित्रा वाघ यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत ही मागणी केली आहे.
चित्रा वाघ म्हणाल्या, “स्वतःला अभिनेता म्हणवणाऱ्या एजाज खानचा ‘हाऊस अरेस्ट’ नावाचा शो हा केवळ अश्लीलतेचा कळस आहे. उल्लू नावाच्या ॲपवर प्रसारित होणाऱ्या या शोचे क्लिप्स आता मुक्तपणे सोशल मीडियावर फिरत आहेत, जे अत्यंत घाणेरडे आहेत. लहान मुलांच्या मोबाईलमध्ये अशा प्रकारचा कंटेंट सहज पोहोचतो आहे. असे कार्यक्रम म्हणजे फक्त संस्कृतीची अवहेलना नाही, तर समाजाच्या आरोग्याची विटंबना आहे. असे कार्यक्रम म्हणजे भावी पिढ्यांच्या मानसिकतेवर विकृत घाला आहे”.
पुढे बोलताना चित्रा वाघ म्हणाल्या, मी माहिती व प्रसारण मंत्री @ashwini.vaishnaw जी यांना विनंती करते की उल्लू ॲपसह असे कंटेंट तयार करणाऱ्या सर्व ॲप्सवर तातडीने बंदी घालावी. “हाऊस अरेस्ट नावाचा शो हा निव्वळ कंटेंट नाही, तर समाजाच्या मूल्यांवर आघात आहे!”
अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली मोकळं रान देणं तात्काळ थांबवलं पाहिजे. ‘हाऊस अरेस्ट शो’वर बंदी घालायला पाहिजे. हा शो म्हणजे अश्लिलतेचा कळस आहे. हे क्लिप्स सोशल मीडियावर फिरत आहेत. लहान मुलांच्या मोबाईलमध्ये हा कंटेट सहजरित्या पोहोचतोय. ही समाजाच्या आरोग्याची विटंबना आहे. हा भावी पिढीवर विकृत घाला आहे, असंही चित्रा वाघ म्हणाल्या आहेत.
Leave a Reply