पाचेंद्रकुमार टेंभरे, मुंबई: शिवसेनेचे मुख्य नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत कल्याण लोकसभा मतदारसंघातील कळवा, खारेगाव, विटावा परिसरातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या माजी नगरसेवकांनी भगवा हाती घेतला आहे. ठाणे महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते मिलिंद पाटील, माज़ी नगरसेविका मनाली पाटील, माज़ी नगरसेवक महेश साळवी, माजी नगरसेविका मनिषा साळवी, माज़ी नगरसेविका व ठाणे महिला राष्ट्रवादी (शरद पवार) कार्याध्यक्षा सुरेखा पाटील, माज़ी नगरसेवक सचिन म्हात्रे यांनी आज मुंबईत शिवसेनेत प्रवेश केला आहे.
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या जनसंपर्क विभागामार्फत पाठवलेल्या निमंत्रण मेसेजमध्ये पक्षप्रवेशासाठी 10.10 वाजताची वेळ ठरवण्यात आलेली होती. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या वर्चस्वाला धक्का देत एकनाथ शिंदे यांनी माजी नगरसेवकांना आपल्या पक्षात खेचलं आहे. आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या कळवा-मुंब्रा मतदारसंघातील माजी नगरसेवकांचा पक्षप्रवेश हा पक्षासाठी मोठा धक्का मानला जात आहे.
दरम्यान, राष्ट्रवादीच्या माजी नगरसेवकांचा 10.10 वाजताचा पक्षप्रवेश आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये ठाण्यात काय बदल घडवून आणतो, हे पाहणं औत्सुक्याचे ठरणार आहे.
Leave a Reply