kshitijmagazine&news

Welcome to Kshitij World. You will find here worlds update and basic information of various things

पुण्यातील बावधनमध्ये हेलिकॉप्टर कोसळले! तिघांचा मृत्यू

पुण्यातील बावधन बुद्रुक येथे हेलिकॉप्टर कोसळून तीन जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बावधनमधील केके बिल्डरच्या डोंगरावर ही घटना झाली आहे. धुक्यामुळे हा अपघात झाल्याची शक्यता वर्तवली जात असून हिंजवडी पोलिस कंट्रोल रूमला याची माहिती मिळाली होती. आज सकाळी साडेसात वाजता ही घटना घडली.

या अपघातात दोन पायलट आणि एका इंजिनिअरचा मृत्यू झाला आहे. हे हेलिकॉप्टर ऑक्सफर्ड गोल्फ हेलिपॅडपासून दीड किलोमिटरच्या अंतरावर कोसळल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाची ४ वाहने घटनास्थळी दाखल झाली तसेच रुग्णवाहिका देखील दाखल झाल्या. या हेलिकॉप्टरमध्ये प्रवास करत असलेल्या तिघांची नावे समोर आली असून प्रीतम भारद्वाज, गिरीश पिलाई आणि परमजीत सिंग यातले दोन वैमानिक होते आणि एक इंजिनियर होते. या तिघांचाही हेलिकॉप्टर दुर्घटनेत दुर्दैवी मृत्यू झाला आहे. हेलिकॉप्टर कोसळल्याची ही महिनाभरातील दुसरी घटना आहे.

दाट धुक्यामुळे हेलिकॉप्टर कोसळल्याची शक्यता वर्तवली जात आहे. स्थानिक प्रशासन आणि पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. मात्र या अपघाताने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली.