साहित्य आणि संस्कृती संवर्धन मंडळ, मराठवाडा साहित्य परिषद यांच्या विद्यमाने आणि महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ यांच्या सहकार्याने आयोजित चौथे मराठी साहित्य संमेलन शिरूर अनंतपाळ येथे आयोजित करण्यात आले आहे. 1 आणि 2 फेब्रुवारी असे दोन दिवस हे साहित्य संमेलन होत आहे. दोन दिवसात एकूण सहा सत्र होणार आहेत. यात ग्रंथ दिंडी ,शोभा यात्रा ग्रंथ प्रदर्शन उद्घाटन सोहळा ,परिसंवाद,कथाकथन,कवी संमेलन सांस्कृतिक कार्यक्रम आणि सांगता समारोप कार्यक्रमाचा समावेश आहे.
लातूर जिल्ह्यातील शिरूर अनंतपाळ येथील देविसिंह चौहान साहित्य नगरीत शनिवारी उद्घाटन सोहळा पार पडला. संमेलनाचे अध्यक्ष साहित्यिक देविदास फुलारी हे आहेत. शिरूर अनंतपाळ सारख्या कर्नाटक महाराष्ट्र सीमेवर असणाऱ्या ग्रामीण भागात हे साहित्य संमेलन होत असल्याने येथे ग्रामीण भागातील वाचकांनी चांगलीच गर्दी केली होती.
सकाळी ग्रंथदिंडी आणि शोभायात्रा काढण्यात आली. यावेळी तालुक्यातील अनेक शाळेतील विद्यार्थीनी आणि भजनी मंडळाने सहभाग घेतला होता. संमेलनस्थळी ग्रंथ प्रदर्शन आणि विक्री करण्यात येत आहे. वाचकांनी ग्रंथ प्रदर्शनला उत्तम प्रतिसाद दिला आहे.
डॉ.मंजुषा कुलकर्णी, प्रशासकीय अधिकारी मुख्यमंत्री कार्यालय यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा साहित्य संमेलनासाठी असणारा संदेश वाचून दाखवला. संमेलनाचे स्वागत अध्यक्ष डॉ. अरविंद भातांब्रे यांच्या देखरेख खाली संमेलनचे आयोजन करण्यात आले आहे.
शिरूर अनंतपाळ सारख्या ग्रामीण भागात हे साहित्य संमेलन होत आहे. या ठिकाणच्या विद्यार्थी आणि तरुण वाचकांपर्यंत साहित्य नेण्यासाठी हे साहित्य संमेलन माध्यम होत आहे. आजच्या घडीला सांस्कृतिक साहित्य सामाजिक राजकीय सर्वच क्षेत्रात बदल होत आहे. हे बदल योग्य पद्धतीने टिपून सर्वसामान्य पर्यंत देण्याचा काम असल्यास साहित्य संमेलनात होत असते. ग्रामीण भागात दर्दी वाचक वर्ग आहे. असे साहित्य संमेलन अनेक भागात होणं आवश्यक आहे असे मत संमेलन अध्यक्ष साहित्यिक देविदास फुलारी यांनी व्यक्त केले.