kshitijmagazine&news

Welcome to Kshitij World. You will find here worlds update and basic information of various things

अभिनेत्री सई लोकूरने दिला गोंडस मुलीला जन्म ; पोस्ट शेअर करत म्हणाली …

अभिनेत्री सई लोकूरला कन्यारत्न प्राप्त झाले आहे. तिने एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे. सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर करुन तिने ही गोड बातमी चाहत्यांना दिली आहे. सई लोकूरनं सोशल मीडियावरील पोस्टमध्ये लिहिलं, “मुलीचे आगमन झाले आहे. ती निरोगी, सुंदर आहे आणि अनेकांना ती प्रिय आहे. या विशेष काळात तुमच्या पाठिंब्याबद्दल आणि प्रार्थनांसाठी आम्ही कृतज्ञ आहोत- साई आणि दीप”. सईनं शेअर केलेल्या पोस्टला सुकन्या मोने, रेशम टिपणीस यांनी कमेंट करुन सई आणि तीर्थदीपला शुभेच्छा दिल्या आहेत.

सई ही गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर तिचे वेगवेगळ्या लूकमधील फोटो शेअर करत होती, ज्यामध्ये ती बेबी बंप फ्लॉन्ट करताना दिसली. सईनं तीर्थदीप रॉयसोबत 2020 मध्ये लग्नगाठ बांधली सई ही तीर्थदीपसोबतचे रोमँटिक फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. सईला इन्स्टाग्रामवर 324K फॉलोवर्स आहेत.