kshitijmagazine&news

Welcome to Kshitij World. You will find here worlds update and basic information of various things

पान मसाल्याच्या जाहिरातीवरून होणाऱ्या ट्रोलिंगवर अजय देवगणने अखेर मौन सोडलं; म्हणाला…

बॉलिवूड कलाकार चित्रपटांसोबतच अनेक जाहिरातींमध्ये काम करत असतात. जाहिरातींसाठी ते चांगले मानधनही मिळते. पण काही वेळेला याच जाहिरातींमुळे त्यांना ट्रोलही व्हाव लागतं. त्यात वरचा नंबर लागतो ते पान मसाल्यच्या जाहिरातीचा. अभिनेता अजय देवगची विमल इलायची, पान मसालाच्या जाहिरातीसाठी नेहमीच चर्चेत असतो. या जाहिरातीमध्ये त्याच्यासोबतच अभिनेता शाहरुख खान आणि अक्षय कुमारही दिसले. या जाहिरातीवरून नेहमीच या अभिनेत्यांना ट्रोल केलं जातं. पण अखेर याच विषयावर अजय देवगणने आता मौन सोडलं आहे.

अजय देवग नुकताच रिलीज झालेल्या ‘सिंघम अगेन’साठी अनेक मुलाखतींमध्ये दिसतो. अशाच एका मुलाखती दरम्यान अजय देवगणने या विषयावर आपलं मौनं सोडलं आहे. रोहित शेट्टी आणि अजय देवगणने रणवीर अलाहाबादियाच्या पॉडकास्टमध्ये हजेरी लावली.अजय देवगण पान मसाल्याची जाहिरात करत असल्याने अनेकदा ट्रोल होतो. ‘जुबा केसरी’चे त्याचे अनेक मीम्सही व्हायरल होतात. रणवीर अलाहाबादियाने त्याच्या पॉडकास्टमध्ये अजय देवगणला याच ट्रोलिंगवर विचारलं असता अजय देवगण,थेटच म्हणाला “ठिके, मला फरक पडत नाही. मी एन्जॉय करतो.” तर रोहित शेट्टीने पुढे म्हटलं की, “आता त्यावरुन आक्षेपार्ह वाटणं बंद झालं आहे. आता मीम्स मधून सगळे एन्जॉय करतात”

अजय देवगणसोबत शाहरुख खान, अक्षय कुमारनेही पान मसालाची जाहिरात केली. मात्र नंतर अक्षय कुमारने माफी मागत या जाहिरातीमधून काढता पाय घेतला. अजय देवगणने त्यावेळी अक्षय कुमारच्या या वागण्यावर धक्कादायक प्रतिक्रिया दिली होती. दरम्यान अजय देवगणने हेही म्हटलं होतं की,”कोणत्या जाहिरातीत काम करायचे हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे. जेव्हा तुम्ही काही काम करता तेव्हा त्याचा परिणाम काय होणार याचा देखील विचार करता. मी कोणत्याही गोष्टी प्रमोट करत नाही. मी इलायचीचे प्रमोशन करत नाहीये. जर या गोष्टी इतक्या वाईट आहेत तर त्या गोष्टींची विक्री बंद करायला हवी”.