‘हाउस अरेस्ट’ शो सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. अभिनेता एजाज खान आणि ‘हाऊस अरेस्ट’ या वेब शोच्या निर्मात्यांविरोधात अश्लील सामग्री प्रसारित केल्याच्या आरोपावरून FIR दाखल करण्यात आली आहे. या शोमध्ये असलेल्या काही दृश्यांमुळे सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. विशेषतः उल्लू अॅपवर प्रसारित झालेल्या एका क्लिपमध्ये एजाज खान एका अभिनेत्रीला अश्लील दृश्य करण्यास प्रवृत्त करताना दिसत आहेत, ज्यामुळे प्रेक्षकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. याप्रकरणी आलेल्या तक्रारीवरुन मुंबई पोलिसांनी एजाज खानविरुद्ध FIR दाखल केला आहे. ठाकरे गटाच्या अयोध्या पोळ यांनी देखील सोशल मीडियावर भावना व्यक्त करत सरकारवर टीकास्त्र सोडले आहे.
काय म्हणाल्या अयोध्या पोळ ?
अशा #अश्लील आणि किळसवाण्या कार्यक्रमावर सरकार काही कारवाई करणार आहे की नाही? आणि जर कारवाई करणार नसतील तर सरकारी लोकांना खोके वेळेवर मिळत असतील म्हणून हा नंगानाच सुरु ठेवला आहे..😡😡
उर्फी ला ज्ञान देणाऱ्या @ChitraKWagh
कुठल्या बिळात जाऊन लपून बसल्या आहेत?😡😡
विकृत
या ट्विटमध्ये त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुंबई पोलीस, भाजप नेत्या चित्रा वाघ यांना देखील टॅग केलं आहे.
संपूर्ण प्रकरण काय?
राष्ट्रीय महिला आयोगाने (NCW) उल्लू अॅपचे सीईओ विभू अग्रवाल आणि होस्ट एजाज खान यांना याआधी समन्स पाठवले आहेत. दोघांनाही ९ मे पर्यंत आयोगासमोर हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. समन्सनुसार, २९ एप्रिल २०२५ रोजी शोची एक छोटी क्लिप व्हायरल झाली. यामध्ये एजाज खान महिला स्पर्धकांना विचित्र प्रश्न विचारताना आणि कॅमेऱ्यासमोर अश्लील पोझ देण्यास सांगताना दिसतोय.
आयोगाचे म्हणणे आहे की, अशाप्रकारचा कंटेट केवळ महिलांच्या प्रतिष्ठेच्या विरोधात नाही तर मनोरंजनाच्या नावाखाली लैंगिक छळाला प्रोत्साहन देणारा आहे. आरोप सिद्ध झाले, तर ते भारतीय न्याय संहिता, 2023 आणि माहिती तंत्रज्ञान कायदा, 2000 अंतर्गत गंभीर गुन्ह्याच्या श्रेणीत येईल. आता मुंबई पोलिसांनी FIR दाखल केल्यावर एजाज खान आणि शोच्या मेकर्सवर पुढील कारवाई काय होणार, याकडे सर्वांचं लक्ष आहे.
Leave a Reply