kshitijmagazine&news

Welcome to Kshitij World. You will find here worlds update and basic information of various things

कोल्हापूर जिल्हयातील गडहिंग्लज तालुक्यातील जनता दल आणि भाजपमधील अनेकांचा राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश ;अजित पवार यांनी केले स्वागत..

राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीत गडहिंग्लज तालुक्यातील जनता दल आणि भाजपा पक्षातील अनेक मान्यवरांनी बुधवारी देवगिरी येथे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला.

अजित पवार यांनी सर्व मान्यवरांचे पक्षात स्वागत केले तसेच सर्वांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी पक्षाचे कोषाध्यक्ष आणि प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, प्रदेश सरचिटणीस लतिफ तांबोळी, प्रदेश प्रवक्ते उमेश पाटील यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत प्रवेश केलेल्यांची नावे खालीलप्रमाणे –

बसवराज सणगावे (माजी नगराध्यक्ष)
नरेंद्र भद्रापूर (माजी उपनगराध्यक्ष)
उदय पाटील (माजी उपनगराध्यक्ष)
अनुप पाटील (सरपंच)
सतिश इटी (शिक्षण मंडळ सदस्य) विनोद बिलावर ( उद्योजक) अभिषेक पाटील (उद्योजक) शंकर घुगरे (सामाजिक कार्यकर्ते) संजय पाटील, (सामाजिक कार्यकर्ते) तारिरभाई कोचरगी, (सामाजिक कार्यकर्ते) गुरुप्रसाद नूलकर आदी.