kshitijmagazine&news

Welcome to Kshitij World. You will find here worlds update and basic information of various things

कलाकारांनी आर्थिक,सामाजिक,शैक्षणिक आणि आरोग्य दृष्ट्या सक्षम व्हावे-मेघराज राजेभोसले

कलाकारांनीच कलाकारांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी स्थापन केलेला कलाकारांचा परिवार म्हणजे बालगंधर्व परिवार महाराष्ट्र राज्य, यांच्या वतीने बालगंधर्व रंगमंदिराचा वर्धापन दिन सोहळा दरवर्षी आयोजित केला जातो तसेच वर्ष भर कलाकारांच्या हिताचे अनेक कार्यक्रम राबवले जातात त्याचाच एक भाग म्हणून या वर्षी बालगंधर्व परिवार महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने आणि एम आर बी फाऊंडेशन पुणे, समुत्कर्ष एंडेव्हर्स प्रा.लिमिटेड पुणे.दिवा फाऊंडेशन पुणे.बढेकर डेव्हलपर्स पुणे यांच्या सहयोगाने पुणे शहर आणि जिल्ह्यातील तब्बल १५०० शे (दीड हजार) कलाकार, तंत्रज्ञ, पडद्यामागिल कलाकारांना दिवाळी अन्नधान्य किट व फराळाचे वाटप करण्यात आले. तसेच कलाकारांनी आर्थिक सामाजिक शैक्षणिक आरोग्य दृष्ट्या सक्षम व्हावे यासाठी बालगंधर्व परिवार महाराष्ट्र राज्य व पुणे महानगर पालिका सामाजिक विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने कलाक्षेत्रात पहिल्यांदाच कलाकारांच्या तब्बल ३० बालगंधर्व परिवार महिला बचत गट व बालगंधर्व परिवार पूरूष बचत गटांची स्थापना व उदघाटन करण्यात आले.कलाकारांच्या सर्वांगीण विकासासाठी हे ऐतिहासिक पाऊल उचलण्यात आल्याचे बालगंधर्व परिवार महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांनी सांगितले.या प्रसंगी विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते .

सध्या महाराष्ट्रात आणि देशात लोकप्रिय असलेला मराठी बिग बॉस ५ चा विजेता,सुरज चव्हाण यांनी या सोहळ्यात सहभागी होऊन आपल्या गुलीगत पॅटर्नने हजारो कलाकारांची मने जिंकली व कलाकारांच्या पाठीशी मेघराज राजेभोसले भैय्यासाहेब कायम उभे असतात व मलाही अनेक वेळा ते मदत करतात असे आवर्जून सांगितले,कलाकारांनी आपल्या कले बरोबर च आर्थिक सक्षमीकरणासाठी प्रयत्न करायला पाहिजेत असेही सुरज चव्हाण म्हणाले.बालगंधर्व परिवार महाराष्ट्र राज्य, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पुणे, नृत्य परिषद महाराष्ट्र राज्य, पिंपरी चिंचवड कलाकार संघ,कला परिवार हडपसर,अशा विविध कलासंस्थांच्या तब्बल १५०० शे दीड हजार कलाकारांनी दिवाळी अन्नधान्य किट व फराळाचा लाभ घेतला.सायंकाळी ७ वाजता शेकडो कलाकारांच्या उपस्थितीत पहिल्यांदाच बालगंधर्व रंगमंदिरात भव्यदिव्य असा दिपोत्सव साजरा करून दिवंगत कलाकारांना अभिवादन करण्यात आले.

बालगंधर्व परिवार महाराष्ट्र राज्यचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व पदाधिकारी व सभासदांनी विशेष परिश्रम घेऊन कार्यक्रम यशस्वी केला.