kshitijmagazine&news

Welcome to Kshitij World. You will find here worlds update and basic information of various things

मोदींना हवं त्यांना भारतरत्न देत आहेत ; उद्धव ठाकरेंचा मोदी सरकारवर हल्लाबोल

देशातील तीन दिग्गजांना भारतरत्न पुरस्कार जाहीर झाले असल्याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नुकतीच ट्विट करून दिली होती. यावरून उद्धव ठाकरेंनी मोदी सरकारवर गंभीर आरोप केलेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींना मतं हवीत म्हणून हवं त्यांना भारतरत्न देत आहेत, असं उद्धव ठाकरेंनी म्हटंलय. मुंबईत सुरू असलेल्या ठाकरे गटाच्या स्थानिय लोकाधिकार समिती अधिवेशनातून ते कार्यकर्त्यांशी संवाद साधत होते. यावेळी त्यांनी राज्यातील गोळीबार प्रकरणावरून राज्य सरकारवर निशाणा देखील साधला आहे.

भारतरत्न पुरस्कारावरून उद्धव ठाकरे पुढे म्हणाले, ‘मोदींना हवं त्यांना भारतरत्न देत आहेत, ज्यांचा जिवंत असताना विरोध तुम्ही केला, जसे की करपुरी ठाकूर, त्यांना जनसंघाने विरोध केला होता, तेव्हा तुम्ही देखील त्यांना विरोध केला, आता बिहारध्ये मत हवे म्हणून त्यांना भारतरत्न देत आहात, तसेच आम्ही तेव्हा मागणी केली होती एम.एस. स्वामिनाथन यांना राष्ट्रपती करावे, जर भारतरत्न देत आहात तर त्यांनी दिलेला अहवाल देखील लागू करावा, हा पोकळपणा आहे, येत्या काळात आणखीन काही भारतरत्न जाहीर करतील, भाजपला वाटत आहे की, एक अख्खा प्रदेश आपल्या बाजूने येईल, पण आता असे राहिले नाही.’