Breaking News

भिवंडीत तेलगळतीमुळे कापड डाईंग कंपनीत मोठा स्फोट, भीषण आगीमुळे कोट्यवधींच नुकसान

भिवंडी येथील बालाजीनगर परिसरातील तपस्या डाईंग कंपनीत बुधवारी रात्री भीषण आग लागली. कंपनीच्या बॉयलरमध्ये तेल गळती झाल्याने मोठा स्फोट होऊन ही आग लागली. या घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दल घटनास्थळी पोहोचले. त्यांनी कंपनीचे गेट तोडून आत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना बाहेर काढले. यानंतर त्यांनी दोन तासांत आगीवर नियंत्रण मिळवले. या घटनेत सुदैवाने जिवत हानी झाली नाही.

भिवंडी येथील बालाजीनगर परिसरातील तपस्या डाईंग कंपनी आहे. या कंपनीत रात्री २ च्या सुमारास बॉयलरमध्ये अचानक मोठा स्फोट झाला. हा स्फोट एवढा भीषण होता की कंपनीच्या काचा फुटल्या. मोठा स्फोट झाल्याने व कापड असल्याने मोठी आग लागली. बघता बघता आगीने उग्र रूप धारण केले. कच्च्या कपड्यापासून पक्के कापड तयार करतांना बॉयलरमध्ये तेल गळती झाली. यामुळे बॉयलरमध्ये स्फोट झाला आणि आग लागली.

अचानक लागलेल्या या आगीमुळे कामगार घाबरले. जिवाच्या भीतीने कामगार कंपनीच्या बाहेर पडण्याचा प्रयत्न करत होते. दरम्यान, या घटनेची माहिती अग्निशामक दलाला मिळाली. अग्निशामक दलाच्या गाड्या घटणास्थळी दाखल झाल्या. त्यांनी तातडीने कामगारांना सुरक्षित बाहेर काढले. यानंतर दोन तासांच्या प्रयत्नानंतर या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले.

या आगीत कंपनीने मोठे नुकसान झाले आहे. कापड जळल्याने आग वाढत गेली. कंपनीतील सामानाला आग लागून मोठे नुकसानझले आहे. आग लागली तेव्हा कंपनीत काही कामगार काम करत होते. त्यांना तातडीने बाहेर काढण्यात आले. स्थानिकांनी कंपनीच्या दिशेने धाव घेत कंपनीचे गेट तोडून आतील कामगारांना बाहेर काढले अग्निशमन दल घटनास्थळी वेळीच आल्याने मोठी दुर्घटना टळली.

भिवंडीत अनेक कंपन्या आहेत. या कंपण्यात आग लागल्याच्या घटना या पूर्वी देखील घडल्या आहेत. भविष्यातील घटना टाळण्यासाठी कंपन्यांचे फायर ऑडिट होणे गरजेचे आहे. येथील कंपन्यांचे फायर ऑडिट करण्यात यावे अशी मागणी कामगारांनी केली आहे.