Breaking News

मोठी बातमी : अभिनेता श्रेयस तळपदेला हृदयविकाराचा धक्का, तातडीने अँजिओप्लास्टी

अभिनेता श्रेयस तळपदे याला हृदयविकाराचा झटका आल्याची माहिती समोर आलीये. श्रेयसला मुंबईतील अंधेरीच्या बेलेव्ह्यू रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हृदयविकाराच्या झटक्यानंतर श्रेयस तळपदेवर अँजिओप्लास्टी करण्यात आली असल्याचं रुग्णालयाकडून माहिती देण्यात आलीये. अवघ्या 47 व्या वर्षी श्रेयस तळपदेला हृदयविकारचा झटका आला. श्रेयस तळपदे आज ‘वेलकम टू द जंगल’ या चित्रपटाचे शूटिंग करत होता आणि शूटिंग संपल्यानंतर तो घरी पोहोचला तेव्हा त्याला छातीत दुखू लागल्याने त्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले.