Breaking News

मोठी बातमी : केंद्र सरकारची पूजा खेडकर यांच्यावर मोठी कारवाई ; पहा काय घडलं

वादग्रस्त सनदी अधिकारी पूजा खेडकरबाबत मोठी बातमी समोर आली आहे. पूजा खेडकर यांच्यावर केंद्र सरकारकडून कारवाई करण्यात आली आहे. पूजा खेडकर यांना सरकारी सेवेमधून बरखास्त करण्यात आलं आहे. पूजा खेडकर यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. या प्रकरणाची कोर्टात केसही सुरू आहे. पूजा खेडकरने शुक्रवारी एम्समध्ये तिच्या अपंगत्वाची तपासणी करण्यास तयार असल्याचं सांगितलं आहे. पूजाने अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केल होता.

काय आहे पूजा खेडकर प्रकरण ?

पूजा खेडकर या 2023 च्या बॅचच्या आयएएस अधिकारी आहेत. त्यांना प्रशिक्षणार्थी अधिकारी म्हणून पुण्यात नियुक्ती मिळाली होती. मात्र, यावेळी त्यांनी कामावर रुजू होण्यापूर्वीच विविध अवास्तव मागण्या करणं सुरू केलं. यावरुन पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी त्यांची राज्याच्या मुख्य सचिवांकडे लेखी तक्रार नोंदवली. त्यानंतर पूजा खेडकर यांची बदली वाशिममध्ये करण्यात आली. मात्र, त्यानंतरही त्यांच्याबद्दल अनेक मुद्दे समोर आल्यानंतर युपीएसीनं त्यांच्याविरोधात एफआयआर दाखल केला. तसंच पूजा खेडकर यांना लालबहादूर शास्त्री अकादमीमध्ये पुन्हा बोलावण्यात आलं. त्यानंतर यूपीएससीमार्फत देण्यात आलेल्या माहितीनुसार पूजा खेडकर यांच्याबाबतच्या गैरप्रकारांची चौकशी पूर्ण झाली आहे. त्यांच्या विरोधात एफआयआर दाखल करण्यात आल्याचं यूपीएससीकडून जाहीर करण्यात आलं.

आत्ताची महत्वाची अपडेट :