kshitijmagazine&news

Welcome to Kshitij World. You will find here worlds update and basic information of various things

मोठी बातमी; पूजा खेडकरला दिल्ली उच्च न्यायालयाकडून दिलासा

वादग्रस्त आयएएस अधिकारी पूडा खेडकरच्या अडचणींमध्ये सातत्यानं वाढ होत असतानाच आता दिल्ली उच्च न्यायालयानं दिलासा देत महत्त्वाची सुनावणी केली आहे. पूजा खेडकरला न्यायालयानं 5 सप्टेंबरपर्यंत दिलासा दिला असून, या निर्णयानुसार खेडकरला 5 सप्टेंबरपर्यंत अटकेपासून संरक्षण जाहीर करण्यात आलं आहे. गुरुवारी अटकपूर्व जामिनाच्या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयानं हा निर्णय सुनावला.

दरम्यान युपीएससीकडून करण्यात आलेल्या आरोपांविषयी न्यायालयात आपली बाजू मांडतानं पूजानं काही गोष्टींची नोंद केली. प्रोबेशनरी ऑफिसर म्हणून निवड आणि नियुक्ती झाल्यानंतर युपीएससीला आपली उमेदवारी अपात्र ठरवण्याचा अधिकार नसल्याचं म्हणत आपल्या नावात कोणतीही फेरफार केली नसल्याची बाब तिनं न्यायालयापुढे मांडली.

युपीएससी आणि दिल्ली पोलिसांच्या तक्रारीवर उत्तर देण्यासाठी न्यायालयानं खेडकरला वेळ दिला आहे. दिल्ली उच्च न्यायालयामध्ये युपीएससीनं पूजा खेडकरच्या अटकपूर्व जामीन अर्जाला विरोध करत याचिका दाखल केली होती. यामध्ये तिनं आयोगासह जनतेची फसवणूक केल्याची बाब अधोरेखित करण्यात आली होती.

केंद्रीय लोकसेवा आयोग 2022 दरम्यानच्या अर्जात चुकीची माहिती दिस्याचा आरोप पूजावर करण्यात आला होता. ज्यानंतर 31 जुलै रोजी UPSC नं तिची उमेदवारी रद्द केली होती. युपीएससीनं न्यायालयात दाखल केलेल्या उत्तरानुसार खेडकरची कोठडीतच चौकशी करणं महत्त्वाचं असून, त्यातूनच फसवणूक उघडकीस येऊ शकेत. ज्यामुळं हा अटकपूर्व जामीन फेटाळण्यात याला. पण, न्यायालयानं मात्र पूजा खेडकरच्या बाजूनं निकाल देत तिला दिलासा दिला.