Breaking News

आताची सर्वात मोठी बातमी! 2 चिमुरडींचं शोषण करणारा बदलापुरचा आरोपी अक्षय शिंदेचा मृत्यू

बदलापूर प्रकरणातील गुन्हेगार अक्षय शिंदे याने तुरुंगात पोलिसांची बंदूक घेऊन गोळीबार केला. ट्रान्झिट रिमांडसाठी घेऊन जात असताना त्याने तीन राऊंड फायर करीत स्वत:वर गोळी झाडल्याची माहिती समोर आली आहे. यात एक पोलीस जखमी झाला आहे. त्याने पोलिसांच्या बंदुकीने स्वत:वर गोळी झाडली. यात त्याचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

संपूर्ण देश खवळून निघालेल्या बदलापुरातील दोन चिमुरडींचं लैंगिक शोषण करणारा आरोपी अक्षय शिंदे याचा तुरुंगात मृत्यू झाल्याची बातमी समोर आली आहे. बदलापुरातील एका प्रसिद्ध शाळेत कर्मचाऱ्याचं काम करणारा अक्षय शिंदे याने शाळेतील चार वर्षांच्या चिमुरडींवर स्वच्छता गृहात लैंगिक शोषण केलं होतं. यानंतर बदलापुरातील नागरिकांनी शाळा आणि प्रशासनाविरोधात मोठं आंदोलन पुकारलं होतं. यावेळी अनेकांनी अक्षय शिंदेला फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली जात होती.

बदलापूर प्रकरणात आरोपी अक्षय शिंदे विरोधात पुरेसे पुरावे नव्हते. यासाठी एका एसआयटीची स्थापना करण्यात आली होती. त्यासाठी पोलिसांनी अक्षय शिंदेंच्या पहिल्या पत्नीचा जबाब नोंदवून घेतला होता.