Breaking News

मुंबई विद्यापीठाच्या carry on म्हणजेच सुवर्णसंधी अभियांत्रिकीसह फार्मसी व आर्किटेक्टच्या विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी मिळावी ; युवासेनेची मागणी

मुंबई विद्यापीठाने carry on नुसार जुन्या अनुत्तीर्ण अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना पुन्हा पुढील वर्षांमध्ये परीक्षेला बसण्यासाठी दिनांक 1 नोव्हेंबर,2023 रोजी परिपत्रक काढून संधी दिली. त्याच अनुषंगाने आर्किटेक्चर आणि फार्मसीच्या जुन्या अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना देखिल परीक्षेला बसण्याची सुवर्ण संधी (GOLDEN CHANCE) देण्यासाठी युवासेनाप्रमुख आमदार श्री आदित्यजी ठाकरे यांच्या आदेशानुसार युवासेना मुंबई विद्यापीठ माजी सिनेट सदस्य यांनी कुलसचिव श्री सुनील भिरुड सर यांना निवेदन दिले.

मुंबई विद्यापीठ विषयास अनुसरुन सिनेट सदस्यांनी मागणी केली की,आमच्यासह इतर विद्यार्थी संघटनांनी केलेल्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देऊन अनेक विद्यार्थ्यांना सुवर्ण संधी (GOLDEN CHANCE) दिली त्याबद्दल आपले अभिनंदन परंतु आर्किटेक्चर आणि फार्मसीच्या विद्यार्थ्यांना सदर संधी दिलेली नाही. तरी या विद्यार्थ्यांनी आमच्याकडे केलेल्या विनंतीला आपण प्रतिसाद देऊन त्यांनाही एक संधी द्यावी अशी मागणी शिवसेना उपनेते सिनेट सदस्या शीतल देवरुखकर-शेठ, शशिकांत झोरे, राजन कोळंबेकर, डॉ धनराज कोहचाडे, माजी विभागप्रमुख दीपक भांबड यांनी केली आहे.