IPL ची सुरूवात करण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या ललित मोदी हे पुन्हा प्रेमात पडले आहे. मोदी यांनी इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट शेअर केली आहे, ज्यामध्ये त्यांची नवी गर्लफ्रेंडही दिसली आहे. मोदींच्या नव्या गर्लफ्रेंडचं नाव काय आहे? ती कुठली आहे? दोघांची भेट कुठे झाली ? हे अद्याप कळू शकलेलं नाहीये. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी दावा केला आहे की मोदी आणि अभिनेत्री सुष्मिता सेन यांचे ब्रेकअप झाले आहे. काही महिन्यांपूर्वी मोदी आणि सुष्मिता सेन यांचे फोटो मोदींनीच सोशल मीडियावर शेअर केले होते. हे दोघे तेव्हा आकंठ प्रेमात बुडाले होते. सुष्मिताचं तेव्हा तिचा बॉयफ्रेंड रोहमन शॉलसोबत ब्रेकअप झालं होतं.

ललित मोदी यांनी त्यांच्या नव्या गर्लफ्रेंडचं नाव काय आहे हे सांगितलेलं नाही. त्यांनी पोस्टमध्ये इतकंच लिहिलं आहे की, ज्या महिलेसोबत ते रिलेशनशिपमध्ये आहेत तिच्यासोबत त्यांची गेली 25 वर्ष मैत्री आहे. 1991 साली मोदी यांचं लग्न झालं होतं. मीनल यांच्याशी त्यांचा विवाह झाला होता. 2018 साली मीनल मोदी यांचा कॅन्सरमुळे मृत्यू झाला होता. यानंतर ललित मोदी आणि सुष्मिता सेन यांच्यातील प्रेमप्रकरणाचा खमंग चर्चा रंगल्या होत्या. ललित मोदी यांनी आपल्या प्रेमाची कबुली दिली होती.

ललित मोदी यांनी व्हिडीओसाठी केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, “”एकदा लकी ठरलो, त्यानंतर दुसऱ्यांदाही लकी ठरलो. 25 वर्षांची मैत्री ही प्रेमात बदलली. हे दुसऱ्यांदा घडले. असे तुमच्यासोबतही नक्की झाले असेल #happyvalentinesday to you all”

3 वर्षांपूर्वी ललित मोदी यांनी आपण सुष्मिता सेनच्या प्रेमात पडल्याचे जाहीर केले होते. सुष्मितासोबतचे फोटो शेअर करत त्यांनी प्रेमाची कबुली दिली होती. मालदीव इथे दोघांनी सुट्टी घालवली होती, आणि तिथले फोटो ललित मोदींनी शेअर केले होते. ललित मोदींनी नव्या गर्लफ्रेंडसोबतचे फोटो शेअर करतानाच आपले सुष्मितासोबतचे नाते तुटल्याचेही अप्रत्यक्षरित्या जाहीर केले आहे.