Breaking News

CBSE बोर्डाचा बारावीचा निकाल जाहीर ; CBSE बोर्डाचा बारावीचा निकाल जाहीर

सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशनने बोर्ड म्हणजेच सीबीएसई बोर्डाने बारावीचा निकाल जाहीर केला आहे. सीबीएसईने सोमवारी, 13 मे रोजी इयत्ता बारावीचा निकाल जाहीर केला आहे. सीबीएसई बोर्डाचा 2024 चा बारावीचा निकाल 87.98 टक्के लागला आहे. यंदाही मुलींना बाजी मारत मुलांना मागे टाकलं आहे. सीबीएसई बोर्डात यंदा 90 टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. सीबीएसई बोर्डाचा इयत्ता 12वी निकाल जाहीर करण्यात आला असून परीक्षार्थी cbse.gov.in किंवा results.cbse.nic.in या अधिकृत वेबसाइटवर त्यांचे निकाल पाहू शकतात.

सीबीएसई बोर्डाचा इयत्ता बारावीचा निकाल जाहीर आहे. CBSE इयत्ता 12वी परीक्षेसाठी या वर्षी 2024 मध्ये 16,33,730 विद्यार्थ्यां नोंदणी केली होती. नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांपैकी तब्बल 16,21,224 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी 14,26,420 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. सीबीएसई बोर्डाच्या निकालात दरवर्षीप्रमाणे यंदाही उत्तीर्ण होण्यामध्ये मुलींचे प्रमाण जास्त आहेत. गेल्या वर्षी उत्तीर्ण होणाऱ्या मुलींचे प्रमाण 90.68 टक्के होते, यावर्षी तुलनेने या प्रमाणात वाढ झाली आहे. यंदा बारावी सीबीएसई उत्तीर्ण होण्याचे मुलींच प्रमाण 91.52 टक्के आहे. या वर्षी मुलांचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण 85.12 टक्के आहे, गेल्या वर्षी हे प्रमाण 84.67 टक्के होतं. मुलांपेक्षा 6.40 टक्के अधिक मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. मुलींनी एकंदरच चांगली कामगिरी केली आहे. ट्रान्सजेंडर विद्यार्थ्यांचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण यंदा 50 टक्के आहे, गेल्या वर्षी हे प्रमाण 60 टक्के होतं.

सीबीएसई बोर्डाच्या निकालात या वर्षी 24,000 हून अधिक विद्यार्थ्यांना 95 टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळाले आहेत. 1.16 लाखांपेक्षा जास्त 90 टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळाले आहेत. यंदा उत्तीर्ण परीक्षार्थी होण्याचे प्रमाण 87.98 टक्के आहे. गेल्या वर्षी, 14 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी 12वीची परीक्षा दिली होती, ज्यांची एकूण उत्तीर्ण टक्केवारी 87.33 टक्के होती. 2022 मध्ये, एकूण 1,435,366 विद्यार्थी परीक्षेला बसले होते, एकूण उत्तीर्णतेची टक्केवारी 92.7 टक्के होती.

लिंगनिहाय टक्केवारी :

  • मुली उत्तीर्ण होण्याचे प्रमाण : 91.52 टक्के
  • मुले उत्तीर्ण होण्याची टक्केवारी : 85.12 टक्के
  • ट्रान्सजेंडर पास टक्केवारी: 50 टक्के