लवंग हा भारतीय स्वयंपाकघरातील एक लोकप्रिय मसाला आहे. याला प्रामुख्याने खडा मसाला म्हणून वापरला जातो. किंवा चहा आणि मसालेदार पेयांमध्ये चव वाढवण्यासाठी वापरला जातो. विविध पदार्थ आणि पेयांमध्ये चव आणि सुगंध वाढवण्याव्यतिरिक्त, ते आपल्या आरोग्यासाठी अनेक प्रकारे फायदेशीर ठरू शकते. विशेषत: ते तुमच्या तोंडाच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. सांगायचे झाले तर माझी आजी-आई तिच्या दात आणि हिरड्या संबंधित समस्यांसाठी अनेक वर्षांपासून लवंग वापरत आहे. या वयातही त्यांचे दात आणि हिरड्या पूर्णपणे निरोगी आहेत. त्यामुळेच आज आपण लवंग पाणीबाबत जाणून घेणार आहोत.
काही काळापूर्वी मलाही दातदुखीचा त्रास होत होता. त्यामुळे माझ्या आईने मला माऊथवॉश म्हणून लवंगाचे पाणी वापरण्याचा सल्ला दिला. तोंडाच्या काळजीमध्ये लवंगाच्या पाण्याचा समावेश करण्याचे इतर अनेक मार्गही तिने मला सांगितले. मला खरं तर त्याच्या वापराचा खूप फायदा झाला. म्हणून मी त्यावर काही संशोधन केले, परिणामी वैद्यकीय शास्त्रदेखील तोंडाच्या आरोग्याशी संबंधित समस्यांमध्ये लवंगाच्या पाण्याच्या फायद्यांचे समर्थन करते. तेव्हा वाटलं तुम्हा सगळ्यांसोबत हे शेअर करावे. चला तर मग उशीर न करता तोंडाच्या आरोग्यासाठी लवंगाच्या पाण्याचे फायदे जाणून घेऊया आणि त्याचे पाणी कसे बनवावे हेदेखील जाणून घेऊया.
लवंगामध्ये अँटी-फंगल आणि अँटीव्हायरल गुणधर्म आढळतात. ज्यामुळे ते तोंडाच्या आरोग्यासाठी एक खास उपाय बनते. लवंगाचा उपयोग दातदुखी, खोकला, हिरड्या, अपचन, दमा, तोंडाचे व्रण आणि तणाव अशा विविध आरोग्य समस्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी केला जातो.
दात किडण्यापासून रोखते-
नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिनच्या मते, लवंगात युजेनॉल नावाचा मजबूत घटक असतो. जो संसर्ग निर्माण करणाऱ्या बॅक्टेरियाशी लढण्यासाठी अँटीसेप्टिक म्हणून काम करतो. अशा प्रकारे, लवंग दातांची पोकळी, म्हणजे दात किडण्यापासून रोखण्यात मदत करते. टूथपेस्ट आणि माउथवॉश यांसारख्या तोंडी उत्पादनांमध्ये लवंग बहुतेकदा मुख्य घटक म्हणून वापरले जाते. याव्यतिरिक्त, दंतचिकित्सक झिंक ऑक्साईडमध्ये मिसळलेले लवंग तेल वापरतात जेणेकरुन संवेदनशील दातांच्या मज्जातंतूंना शांत करण्यासाठी फायदा होतो.
श्वासाची दुर्गंधी कमी करते-
लवंगमध्ये नैसर्गिकरित्या अँटी बॅक्टेरियल गुणधर्म असतात. जे श्वासाची दुर्गंधी आणणारे बॅक्टेरिया नष्ट करतात. यामुळे तुमच्या श्वासात ताजेपणा येतो. लवंगाची स्वतःची चव आणि सुगंध असतो. ज्यामुळे तुमच्या श्वासाला छान वास येतो.
लवंग पाणी किंवा चहा कसा तयार करायचा?
-सर्व प्रथम एका भांड्यात २ कप पाणी घेऊन गॅसवर उकळू द्या.
-आता 3 ते 4 लवंगाच्या काड्या ठेचून पाण्यात टाका.
-पाणी पुन्हा ५ मिनिटे उकळू द्या, नंतर गॅस बंद करा.
-तुम्हाला हवे असल्यास तुम्ही त्यात लवंग तेलाचे ४ ते ५ थेंब टाकू शकता.
-जर तुम्हाला त्याचा चहा म्हणून आनंद घ्यायचा असेल तर हे पाणी गरमागरम प्या.
-जर तुम्हाला ते पाणी म्हणून वापरायचे असेल तर काही वेळ थंड होऊ द्या किंवा कोमट झाल्यावर ते तोंडात घेऊन गुळण्या करा.
-हे पाणी नैसर्गिक माउथवॉशसारखे काम करेल.