लग्नसराईच्या दिवसात ग्राहकांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. दिवाळीनंतर सोनं आणि चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. गेल्या दोन ते तीन आठवड्यांपासून सोने आणि चांदीमध्ये चढ-उतार होताना दिसत आहे. दिवाळीत सोन्याच्या दरातने उच्चांक गाठला होता. मात्र, आता सोनं जवळपास ५ हजाराने स्वस्त झाले आहे. अमेरिका राष्ट्राध्यक्षाच्या निवडणुका झाल्यानंतर डॉलर इंडेक्समध्ये तेजी आली होती. त्यानंतर वायदे बाजारात मात्र सोन्याच्या दरात घट झाली आहे. सराफा बाजारात आज दोन्ही मौल्यवान धातुंच्या किंमतीत घट झाल्याचे पाहायला मिळतेय.
वायदे बाजारात आज MCX (मल्टी कमोडिटी एक्सचेंज) वर ८२ रुपयांची घट झाली आहे. त्याचबरोबर ७४,०७२ रुपये प्रति १० ग्रॅमवर येऊन पोहोचले आहेत. तर, गुरुवारी ७४,१५४ वर सोनं स्थिरावलं होतं. आज चांदीच्या दरात ३०४ रुपयांची घट झाली आहे त्यामुळं सोनं ८८,८९३ रुपये प्रति किलोग्रॅमवर व्यवहार स्थिर झाला होता. तर, मागील व्यवहार ८९,१९७ रुपयांनी ०. ३४ % घसरला आहे.
वायदे बाजारातील भाव पाहिल्यास सोनं ऑक्टोबर महिन्यात ७९,५०० रुपयांपर्यंत दर पोहोचले होते. त्यानंतर आता सोनं जवळपास ५,६०० रुपयांपेक्षा अधिक घसरले आहे. चांदी ऑक्टोबरमध्ये १,००,५६४ रुपयांच्या उच्चांकीवर असताना या तुलनेत MCXवर चांदीचे दर ११,६०० रुपयांपर्यंत घसरले आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील कमजोर मागणीमुळं राष्ट्रीय राजधानी सराफा बाजारात सोन्याच्या दरात घट झाली आहे.
दिवाळीनंतर सोने आणि चांदीच्या दरात मोठी घसरण सुरू आहे. १५ दिवसांत १० ग्रॅम शुद्ध सोन्याचे दर ५,७०० रुपयांनी कमी होऊन गुरुवारी ७४,५०० रुपये आणि चांदीचे दर तब्बल ११ हजार रुपयांनी उतरून ८९ हजार रुपयांवर स्थिरावले. बुधवारच्या तुलनेत गुरुवारी सोने ९०० रुपये व चांदीचे दर १,८०० रुपयांनी घसरले. शेअर बाजारातील तेजीमुळे दर घसरल्याचे सराफा व्यावसायिकांनी सांगितले.