kshitijmagazine&news

Welcome to Kshitij World. You will find here worlds update and basic information of various things

‘IBD विरुद्ध SD: चॅम्पियन्स का टशन’मध्ये खतरनाक अॅक्ट आणि जबरदस्त टक्कर

सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील ‘इंडियाज बेस्ट डान्सर व्हर्सेस सुपर डान्सर: चॅम्पियन्स का टशन’ मध्ये या आठवड्यात पुन्हा एकदा डान्सची आव्हाने, नाट्यमय थट्टा-मस्करी आणि भावुक करणारे परफॉर्मन्स प्रेक्षक अनुभवतील. हर्ष लिंबाचिया या शोचा होस्ट असून मलाइका अरोरा आणि गीता कपूर अनुक्रमे इंडियाज बेस्ट डान्सर आणि सुपर डान्सर या टीम्सचे प्रतिनिधित्व करताना दिसतील. रेमो डिसूझा परीक्षकांच्या पॅनलवरील प्रमुख परीक्षक असून या अटीतटीच्या स्पर्धेत निष्पक्ष न्याय होईल याची तो काळजी घेतो. या आठवड्यात, नववर्षाच्या विशेष भागात अभिनेता आणि कॉमेडीयन संकेत भोसले संजय दत्त आणि रणबीर कपूरची नक्कल करून धमाल उडवून देईल आणि ‘बक बक अवॉर्ड’ व ‘गिरा हुआ अवॉर्ड’ सारखे विचित्र पुरस्कार देईल, जे पाहताना सगळ्यांची हसून हसून मुरकुंडी वळेल.


‘जशन पे टशन’ पासून आव्हानांची सुरुवात झाली. ज्यामध्ये दोन्ही टीम्सनी ‘जश्न-ए-इश्क’ आणि ‘अपना टाइम आएगा’ सारख्या गाण्यांवर जबरदस्त जोशपूर्ण परफॉर्म केले. हे परफॉर्मन्स पाहून मलाइका उद्गारली, “प्रत्येक जण आपले संपूर्ण योगदान देत आहे आणि एकत्रितपणे डान्सच्या एका सुंदर विश्वाचे निर्माण होत आहे. टीम इंडियाज बेस्ट डान्सर, तुमची मालकीण असल्याचा मला अभिमान आहे.”

दुसरा चॅलेंज होता ‘अभी मजा आएगा ना भिडू’. यामध्ये सुपर डान्सर टीममधल्या तुषार आणि अरशिया या प्रतिभावान स्पर्धकांची टक्कर इंडियाज बेस्ट डान्सरमधल्या समर्पण आणि स्टीव्हशी झाली. या दोन्ही टीम्स डान्सच्या दृष्टीने अगदी तुल्यबळ असल्यामुळे त्यांच्यात तरतम भाव करणे रेमोसाठी कठीण झाले.


तिसरे चॅलेंज ‘देसी तडका’ हे विशेष होते. यामध्ये अनुराधा आणि तेजसचा सामना सौम्या आणि अकीनाशी झाला. या अॅक्टमध्ये तेजसच्या डोळ्यावर पट्टी बांधली होती. त्याचे खतरनाक स्टंट पाहताना सगळ्यांची धडधड वाढली होती. या स्टंटमध्ये मंचावरून पडण्याचा एक योजलेला स्टंट देखील होता.

‘मैं ठहरा रहा, जमीं चलने लगी’ चॅलेंजमध्ये रुपसा आणि देवपर्णा यांनी मूव्हिंग फ्लोरवर परफॉर्म केले. या परफॉर्मन्सवरून रेमो आणि गीता यांच्यात खूप बोलाचाली झाली. रेमोचे म्हणणे होते की, रुपसाच्या अॅक्टला आणखी सपोर्टची गरज होती. त्यावरून परफॉर्मन्सच्या निष्पक्षतेवरून वाद सुरू झाला. त्यानंतर, ‘तुरूप का इक्का’ चॅलेंजमध्ये फ्लोरिना आणि परीने विवेक आणि शिवांशुचा सामना केला. यावेळी रेमोने दोन्ही टीम्सचे त्यांच्या संकल्पनेबद्दल अभिनंदन केले.


त्यानंतर क्लॅश ऑफ टायटन्स चॅलेंजमध्ये वैभव आणि परीने एक बाप-बेटीचा हृदयस्पर्शी अॅक्ट सादर केला. या दिवसातील तो सर्वात भावुक क्षण होता. या अॅक्टमध्ये आपल्या मुलीला वेळ देता यावा यासाठी होत असलेली पित्याची ओढाताण पाहून रेमो भारावून गेला. त्याने एक पिता म्हणून आपला अनुभव देखील शेअर केला. तो प्रेक्षकांना उद्देशून म्हणाला, “माझी इच्छा आहे की हा अॅक्ट सर्व मुलांनी आणि पालकांनी बघावा. आणि त्यामधून त्यांनी बोध घ्यावा.”

त्या रजनीचा समारोप एका अल्टीमेट टशन राऊंडने झाला. यामध्ये सुपर डान्सरचा संचित आणि इंडियाज बेस्ट डान्सरचा समर्पण यांच्यात ‘इशकजादे’ आणि ‘दिल से रे’ सारख्या गाण्यांवर जबरदस्त टक्कर झाली. या दोन्ही स्पर्धकांनी अप्रतिम परफॉर्मन्स दिला, जो पाहताना परीक्षक आणि स्पर्धक अवाक झाले.

हे सगळे नाट्य, भावना आणि जबरदस्त प्रतिभा बघा, दर वीकएंडला रात्री 7 वाजता ‘इंडियाज बेस्ट डान्सर व्हर्सेस सुपर डान्सर: चॅम्पियन्स का टशन’ मध्ये फक्त सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर !