Breaking News

थंडी गायब! कोकण, गोव्यासह राज्यातील ‘या’ जिल्ह्यात पावसाची शक्यता

तमिळनाडू व केरळमध्ये बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे वातावरणात मोठा बदल झाला आहे. त्यामुळे राज्यातील हवामानात देखील मोठा बदल झाला आहे. राज्यात काही जिल्ह्यात आज पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे काही ठिकाणी थंडी कमी झाली आहे. तर मुंबई आणि काही जिल्ह्यात तापमानात वाढ झाली आहे. तर काही ठिकाणी धुके वाढले आहे.

पुणे वेध शाळेने दिली माहिती :

पुणे वेध शाळेने दिलेल्या माहितीनुसार, कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्रात मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. विदर्भात हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग कोल्हापूर व कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे जिल्ह्यात काही तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

गेल्या २४ तासात तापमानात घट झालेली नाही. तर पुढील काही दिवस तापमानात घट होईल याची शक्यता कमी असल्याचं हवामान विभागाने म्हटलं आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग कोल्हापूर व कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यात वादळी वारे, विजांचा कडकडाट व ताशी ३० ते ४० किमी वेगाने वारे वाहून तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर मराठवाड्यातील लातूर जिल्ह्यात देखील पावसाची शक्यता आहे. या पावसामुळे पिकांचे नुकसान होण्याची शक्यता आहे.

पुढच्या पाच दिवसात २ ते ३ अंश डिग्री सेल्सियसने तापमान खाली उतरण्याची शक्यता आहे. मात्र थंडीसाठी आणखी थोडी वाट पाहावी लागणार आहे.

मुंबईत उकाडा वाढला

मुंबईत उकाडा वाढला आहे. दक्षिण कोकण व दक्षिण मध्य महाराष्ट्रात हवामानात मोठ्या प्रमाणात बदल होत असल्याने हवेतील आर्द्रतेचं प्रमाण वाढलं आहे. यामुळे मुंबईत काही ढगाळ हवामान असून उकाडा वाढला आहे. हवामान विभागाने १७ नोव्हेंबरपासून थंडी वाढण्याची शक्यता वर्तवली आहे.

पुण्यात ढगाळ वातावरण

पुण्यात गेल्या दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे. शुक्रवारी दिवसभर हवामान ढगाळ होते. तर सकाळी मोठ्या प्रमाणात धुके पडले होते. या वातावरणाचा पिकांवर मोठा परिमाण होण्याची शक्यता आहे. तसेच रोगराई पडण्याची देखील शक्यता वर्तवण्यात आली आहे. आज पुण्यात हवमान कोरडे राहून काही तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *