देण्यासाठी, पुनीत बालन ग्रुपने 21 ऑगस्ट ते 24 ऑगस्ट 2024 दरम्यान चार दिवसीय हेल्मेट वितरण आणि वाहतूक जनजागृती मोहीम आयोजित केली होती. पुणे पोलिस, पुणे वाहतूक पोलिस, आणि पुणे परिवहन कार्यालयाच्या (आरटीओ) सहकार्याने या मोहिमेत एक हजार हेल्मेट्सचे वितरण करण्यात आले.
या मोहिमेचे उद्घाटन कौन्सिल हॉल चौक येथे अतिरिक्त पोलीस आयुक्त मनोज पाटील (पूर्व विभाग आणि वाहतूक, पुणे शहर) यांच्या हस्ते करण्यात आले. या उद्घाटन सोहळ्याला एसीपी निकम, डीसीपी संदीप गिल (झोन 1), कर्नल महादेव आणि एपीआय प्रसाद डोंगरे (बंड गार्डन वाहतूक विभाग) यांची उपस्थिती होती.
दुसऱ्या दिवशी शास्त्री चौक येरवडा येथे डीसीपी झोन 4 ट्रॅफिक हिम्मत जाधव यांच्या हस्ते उद्घाटन झाले. त्यांच्यासह सरला सूर्यवंशी, सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक, वरिष्ठ पीआय अरविंद गोकले, एसीपी प्रांजली सोनावणे, आणि वरिष्ठ पीआय रविंद्र शेलके उपस्थित होते.
ब्रेमेन चौक येथे तिसऱ्या दिवशी एसीपी अनुजा देशमाने आणि पीआय मीनल सुपे पाटील यांच्या हस्ते उद्घाटन झाले, तसेच सरला सूर्यवंशी, सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक उपस्थित होते.
या मोहिमेच्या समारोप प्रसंगी सारसबाग येथे झालेल्या कार्यक्रमाला शोभा क्षीरसागर (दत्तवाडी वाहतूक एपीआय), सरला सूर्यवंशी (सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक), आर्थिक फिटनेस कोच सुधीर खोत, पुणे सिटी बॉक्सिंग असोसिएशनचे सचिव मदन वाणी, आणि रोटेरियन शीतल शाह, रोटरी डिस्ट्रिक्ट गव्हर्नर, पुणे यांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला. चार दिवस चाललेल्या या मोहिमेचे एकूण 1000 हेल्मेट्सचे वाटप करण्यात आले.
या मोहिमेत विमान नगर महिला क्लब, रोटरी क्लब ऑफ पुणे, इनर व्हील क्लब ऑफ पूना डाउनटाउन, रोटरी क्लब ऑफ पूना डाउनटाउन, रोटरी ई-क्लब ऑफ पुणे डायमंड, एबीपी महिला क्लब, ध्रुव डिफेन्स मोटिवेशन सेंटर, स्टार बॉक्सिंग अकॅडमी, अंतरनाथ सोशल फाउंडेशन या संस्थांच्या स्वयंसेवकांनी सक्रिय सहभाग घेतला होता.