Breaking News

जपानला भूकंपाने पुन्हा हादरवलं ; 7.1 तीव्रतेचा झटका, त्सुनामीची पण भीती

जपानला भूकंपाने पुन्हा हादरवलं आहे. जपानमध्ये भूकंपाचे तीव्र हादरे बसले. रिश्टर स्केलवर त्याची तीव्रता 7.1 नोंदवण्यात आली. भूंकपासोबतच जपानला त्सुनामीच्या लाटा पण तडाखा देण्याची शक्यता आहे. भूकंपाचे झटके जपानच्या मियाझाकी परिसराला बसले आहेत. जपानच्या किनारी पट्टीवरील मियाझाकी, कोची, इहिमे, कागोशिमा आणि आहता या भागांना त्सुनामीचा अलर्ट देण्यात आला आहे. नागरिकांन सुरक्षित स्थळी हलविण्यात येत आहे.

या नवीन वर्षाच्या दुसऱ्याच दिवशी भूंकपाने जपानला हादरवले होते. 2 जानेवारी रोजी 7 तासात तब्बल 60 भूंकपाने जपानची भूमी हादरली. तर त्याचवेळी त्सुनामीचा धोका पण आला. समुद्रात मोठ्या लाटा उसळल्या. त्यावेळी जवळपास 1 लाख नागरिकांना किनारपट्टीहून सुरळीत स्थळी हलवण्यात आले होते. ग्रेट कांटो भूंकप 1923 मध्ये आला होता. त्यात टोकियोला मोठा फटका बसला होता. या अपघातानंतर जपानचा पहिला भूकंप प्रतिरोधक बिल्डिंग कोड तयार करण्यात आला. इमरातीत स्टील आणि काँक्रीटचा वापर सुरु झाला. लाकडी इमारतीसाठी जाड खांब अनिवार्य करण्यात आला. भूंकप आला की इमारतीसाठी नवीन नियमावली तयार करण्यात येते. त्याआधारे बदल होतो.