खासदार विनायक राऊत यांच्या माध्यमातून कुडाळ तालुक्यातील गोवेरी येथे बीएसएनएलचा 4G मोबाईल टॉवर मंजूर झाला असून आज आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून टॉवरचे भूमिपूजन करण्यात आले. हा टॉवर विजेवर तसेच सौरऊर्जेवर देखील चालणार आहे. त्यासाठी सोलर किट बसविण्यात येणार आहे. त्याबद्दल खा. विनायक राऊत, आ. वैभव नाईक यांचे ग्रामस्थांनी आभार मानले.
यावेळी आ. वैभव नाईक म्हणाले, खा. विनायक राऊत यांच्या माध्यमातून जिल्ह्यात १५६ बीएसएनएल 4G टॉवर मंजूर झाले आहेत. गोवेरील टॉवर हा त्यातीलच एक आहे. एका दिवसांत किंवा एका पत्रावर हे टॉवर मंजूर होत नाहीत तर त्यासाठी २ ते ३ वर्षे सातत्याने पाठपुरावा करावा लागतो. खा. विनायक राऊत यांनी हे करून दाखवले आहे. त्याबद्दल त्यांचे कौतुक करावे तेवढे थोडे आहे. त्यांनी टॉवरसाठी घेतलेले परिश्रम जनतेला ठाऊक आहेत असे आ. वैभव नाईक यांनी सांगितले.
याप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते, कुडाळ तालुकाप्रमुख राजन नाईक, तालुका संघटक बबन बोभाटे, तेंडोली विभागप्रमुख संदेश प्रभू, उपविभाग प्रमुख एम. बी. गावडे, माड्याचीवाडी माजी सरपंच सचिन गावडे, गंगाराम सडवेलकर,माजी सरपंच रमेश गावडे, ग्रा.प. सदस्य मोहन जाधव, तंटामुक्ती अध्यक्ष उमेश घाटकर,शाखा प्रमुख संजय वारंग,सुलोचना भगत,लक्ष्मी भगत,विजय भगत,दत्ताराम पालकर,सत्यवान हरमलकर,सुदाम गावडे,भिवा गावडे,यशवंत परब,देऊ परब,साबाजी गावडे, बूथ प्रमुख उमेश गावडे,राजू राऊळ,भाई लिंगवे,सीताराम गावडे,भगवान गावडे,दशरथ गावडे, बाबी राऊळ,बाळा राऊळ, संतोष परब,अरुण राऊळ,विजय जाधव,संतोष जाधव,अपूर्वा जाधव,ग्रामसेवक श्री. भोगटे, संगीता गावडे आदी गोवेरी ग्रामस्थ उपस्थित होते.