Breaking News

एकनाथ शिंदेंनी भर विधानसभेत जे बोलून दाखवलं ते करून दाखवलं

एकनाथ शिंदे यांनी बंड केलं. त्यानंतर ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. त्यावेळी झालेल्या पहिल्याच अधिवेशनात एकनाथ शिंदे यांनी केलेले भाषण जोरदार गाजले. त्या भाषणात आपण बंड का केले? सुरतला कसे गेलो? तिथून गुवाहाटीचा प्रवास आणि नंतर मुख्यमंत्री याबाबत त्यांनी सर्व सांगितले. शिवाय आपल्या आमदारांना काय सांगितलं होतं ते ही सांगितले. सर्वात महत्वाचं म्हणजे त्यांनी याच भाषणात आपण आणि देवेंद्र फडणवीस मिळून दोनशे आमदार निवडून आणू असं सांगितलं होतं. त्यांनी सांगितलेला तो शब्द आता खरा करून दाखवला आहे. त्यांनी केलेले हे भाषण सध्या जोरदार व्हायरल होत आहे.

2022 ला एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली होती. त्यावेळी विधानसभेत मुख्यमंत्री म्हणून केलेल्या पहिल्या भाषणाची चर्चा आता होत आहे. त्या भाषणात एकनाथ शिंदे यांनी मी आणि देवेंद्र फडणवीस मिळून 200 आमदार निवडून आणू असं सांगितलं होतं.सर्व जण म्हणत होते काय चिन्ही मिळेल पुढे काय होईल. त्यावेळी मी सर्व आमदारांनी शब्द दिला होता. 50 पैकी एकाही आमदाराला पडू देणार नाही. आम्ही 50 आणि भाजपचे 115 आमदार असे 165 नाही तर 200 आमदार निवडून आणून दाखवू असं शिंदे म्हणाले होते. तसं केलं नाही तर गावाला निघून जाईन. शेती करेन असे एकनाथ शिंदे त्या भाषणात बोलले होते. विशेष म्हणजे हे त्यांनी तत्कालीन विरोधी पक्षनेते अजित पवार यांना उद्देशून बोलले होते.

याच भाषणात त्यांनी हा काही एका दिवसाचा कार्यक्रम नव्हता. हे सुनिल प्रभूंना नाहीत आहे असंही शिंदे म्हणाले. होते. माझं खच्चीकरण करण्या प्रयत्न केला. मी शिवसैनिक आहे. अन्याय होत असेल तर शांत बसायचं नाही हे आम्हाला माहित आहे. त्यामुळेच जे व्हायचं ते होवून दे. पणआता माघार नाही. शिवसेना वाचवण्यासाठी शहीद झालो तरी चालेल. एकटा शहीद होईल. पण बाकीचे वाचतील असा विचार केला आणि मोठा निर्णय घेतला असं शिंदे म्हणाले होते.

ज्यावेळी आमदार माझ्या बरोबर आले त्यावेळी तुम्ही चिंता करू नका असं त्यांना सांगितलं होतं. तुमच्या आमदारकीची काळजी माझी. तुमचं नुकसा होणार नाही ही माझी गॅरंटी त्यांना दिली होती. तुमचं भवितव्य सुरक्षित करेन. तुमचं नुकसान होवू देणार नाही असा शब्द दिला होता असंही ते म्हणाले. ज्यावेळी सुरतला होतो त्यावेळी माझ्याकडे चर्चेला माणसं पाठवली. त्यावेळी माझे गटनेता पद काढून घेण्यात आले. माझ्या घरावरही हल्ला करण्याचे नियोजन केले होते. आमचे त्यावेळी बाप काढले. आम्हाला रेडा संबोधण्यात आले. महिला आमदारांना काही बोलण्यात आले. आम्ही शांत राहीलो. पण अन्याय झाला तर आम्ही शांत राहात नाही असेही शिंदे त्यावेळी म्हणाले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *