गेल्या काही दिवसांपासून नागा चैतन्य आणि शोभिता धुलिपाला यांच्या लग्नाची जोरदार चर्चा रंगली होती. काल ४ डिसेंबर रोजी अन्नपूर्णा स्टुडिओमध्ये त्यांनी लग्न गाठ बांधली आहे. जवळचे नातेवाईक आणि मित्रपरिवाच्या उपस्थितीमध्ये हा विवाहसोहळा पार पाडण्यात आला. नागा चैतन्यचे वडील नागार्जुनने सोशल मीडियावर लग्नातील फोटो शेअर केले आहेत.
नागार्जुनने त्याच्या एक्स अकाऊंटवर मुलाच्या लग्नातील फोटो शेअर केले आहेत. ‘शोभिता आणि चाय यांना त्यांच्या आयुष्याचा हा सुंदर अध्याय सुरू करताना पाहणे माझ्यासाठी खास आणि भावनिक क्षण आहे. माझ्या लाडक्या चायचे अभिनंदन, आणि कुटुंबात स्वागत प्रिय सोभिताचे. तू आधीच आमच्या आयुष्यात खूप आनंद आणला आहेस. ए. एन. आर. गारू यांच्या शताब्दी वर्षानिमित्त उभारण्यात आलेल्या पुतळ्याच्या आशीर्वादाने हा उत्सव सुरू होत असल्याने या उत्सवाला अधिक चपखल अर्थ प्राप्त झाला आहे. या प्रवासाच्या प्रत्येक पावलावर त्यांचे प्रेम आणि मार्गदर्शन आपल्यासोबत आहे, असे वाटते. तुम्ही दिलेल्या आशीर्वादासाठी मी कृतज्ञतेने आभार मानतो’ या आशयाची पोस्ट नागार्जुनने केली आहे.
शोभिताने लग्नात सोनेरी रंगाची सिल्क साडी परिधान केली होती. त्यावर शोभून दिसेल असेल सोन्याची ज्वेलरी घातली आहे. केसात गजरा, सिंपल मेकअप लूकमध्ये शोभिता अतिशय सुंदर दिसत आहे. तर नागा चैतन्यने पारंपरिक लूक केला आहे. दोघेही या लूकमध्ये अतिशय सुंदर दिसत आहेत. त्यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
नागा चैतन्य आणि शोभिता धुलिपाला यांनी हैदराबादमधील अन्नपूर्णा स्टुडिओमध्ये लग्न गाठ बांधली. नागा चैतन्यचे आजोबा, प्रसिद्ध अभिनेते-निर्माते अक्किनेनी नागेश्वर राव यांनी १९७६ मध्ये स्थापन केलेला अन्नपूर्णा स्टुडिओ हैदराबादच्या बंजारा हिल्स मध्ये २२ एकरमध्ये पसरलेला आहे. स्टुडिओने ६० हून अधिक फीचर चित्रपटांची निर्मिती झाली आहे. तसेच टॉलिवूड चित्रपट निर्मितीचे हे एक प्रमुख केंद्र आहे. हा भारतातील सर्वात मोठा चित्रपट निर्मिती स्टुडिओ आहे.