kshitijmagazine&news

Welcome to Kshitij World. You will find here worlds update and basic information of various things

कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री येडीयुरप्पा यांच्यावर अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी पोक्सो अंतर्गत FIR दाखल !

कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांच्यावर एफआयआर दाखल करण्यात आला आहे. त्याच्याविरुद्ध पोक्सो आणि ३५४ (ए) आयपीसी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

17 वर्षीय मुलीच्या आईने 2 फेब्रुवारी रोजी अधिकृत बाबींच्या संदर्भात एका बैठकीत भाजपच्या वरिष्ठ नेत्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप करत तक्रार दाखल केली होती. यानंतर पोलिसांनी माजी मुख्यमंत्र्यांविरुद्ध POCSO (लैंगिक अत्याचार) अंतर्गत आणि कलम 354 A (लैंगिक छळ) प्रकरणात गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान अल्पवयीन मुलीच्या आईने केलेल्या आरोपांनतर येडियुरप्पा यांनी कोणतेही जाहीर वक्तव्य जारी केलेलं नाही.