Breaking News

गायकवाड,शर्मा, दास,लागू ठरले यंदाचे पुणे आयडॉल विजेते ; भाटे, कांबळे, कवठेकर बांबुर्डे , उपविजेते….

सोमेश्वर फाउंडेशन आयोजित 22 व्या पुणे आयडॉल गायन स्पर्धेत रिद्धी गायकवाड (लिटिल चॅम्प्स) सौरभ शर्मा ( युवा) शुभ्रसमीर दास (जनरल) संजय लागू ( ओल्ड इज गोल्ड ) विजेते ठरले. देवांश भाटे, गोविंद कांबळे अजय कवठेकर, डॉक्टर सायली बांबुर्डे या उपविजेता ठरल्या. पूजा मोरे, आरंभी रिठे यांना उत्तेजनार्थ सन्मानित करण्यात आले. यंदा 457 स्पर्धकांनी या स्पर्धेमधे सहभाग घेतला होता. त्यातील साठ स्पर्धकांनी अंतिम फेरीत बालगंधर्व येथे आपले गायन कला सादर केली.

जितेंद्र भूरूक,राजेश दातार, मंजुश्री ओक, मेधा चांदवडकर यांनी अंतिम फेरीचे परीक्षण केले. सोमेश्वर फाउंडेशन यांच्यावतीने विविध क्षेत्रात कार्यरत असणारे मात्र कलेची आवड जपणारे दीपक मानकर (सामाजिक), माधव जगताप (उप आयुक्त मनपा) सुनील यादव (एसीपी ) इब्राहिम शेख (कायदेविषयक ) शैलेश काळे (पत्रकार) रविराज रांका (उद्योगपती) यांना व्हॉइस ऑफ द चॉईस या पुरस्काराने सन्मानित करून त्यांनी त्यांची गायकी सादर केली.

प्रस्तावना व स्वागत कार्यक्रमाचे संयोजक सनी विनायक निम्हण यांनी केले. या कार्यक्रमाला D.C.P संदीपसिंग गिल, मुरलीधर मोहोळ, बाबुजी वाळुंज, डॉ. किशोर पंडित, अशोक मानकर, माजी नगरसेविका शैलेजा खेडेकर, दामोदर कुंबरे, मुकारी अलगुडे, बिपिन मोदी आदी मान्यवर उपस्थित होते. मिलिंद कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले. उमेश वाघ, अमित मुरकुटे यांनी आभार मानले. स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी टिंकू दास, वनमाला कांबळे, अनिकेत कपोते, गणेश शेलार,अभिषेक परदेशी, संजय तारडे, किरण पाटील, संजय माझी रे,समद शेख,संजय बालवडकर, अभिमान धोत्रे,प्रमोद कांबळे,सचिन इंगळे यांनी विशेष प्रयत्न केले.