kshitijmagazine&news

Welcome to Kshitij World. You will find here worlds update and basic information of various things

सोने महागले, चांदीचा दिलासा, काय आहेत भाव आता?

नवीन वर्षाच्या सुरुवातीला सोने आणि चांदीने कहर केला. दोन्ही धातुनी मोठी झेप घेतली. गेल्या आठवड्यात सोने 1600 रुपयांनी तर चांदी 2 हजार रुपयांनी महागली. त्यानंतर या आठवड्यात चांदीत नरमाई कायम आहे. तर सोने पुन्हा वधारले. 1 फेब्रुवारी रोजी केंद्रीय बजेट सादर होत आहे. त्यानंतर लवकरच सोने 90 हजारी सलामी देईल. तर चांदी 1 लाख 10 हजारांच्या घरात पोहचेल, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे. सध्या असा आहे या दोन मौल्यवान धातुचा भाव…

गेल्या आठवड्यात सोन्याने महागाईचा कळस लावला. 1600 रुपयांची रॉकेट भरारी घेतली. तर या सोमवार, मंगळवारी भाव स्थिर होता. बुधवारी त्यात 100 रुपयांची दरवाढ झाली. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 72,400 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 78,970 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

चांदीने गेल्या काही दिवसात ग्राहकांना दिलासा दिला. जितका भाव वधारला, तितकीच त्यात घसरण झाली. गेल्या आठवड्यात 3 जानेवारी रोजी चांदी 2 हजारांनी उसळली होती. तर 4 जानेवारीला 1 हजारांनी किंमत उतरली. तर या आठवड्यात सोमवारी चांदी 1 हजारांनी वधारली. काल भाव स्थिर होता. तर आज सकाळी घसरणीचे संकेत मिळत आहेत.गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 92,500 रुपये इतका आहे.

आज सकाळच्या सत्रात इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA) 24 कॅरेट सोने 77,364, 23 कॅरेट 77,054, 22 कॅरेट सोने 70,865 रुपयांवर आहे. 18 कॅरेट आता 58,023 रुपये, 14 कॅरेट सोने 45,258 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आहे. एक किलो चांदीचा भाव 89,503 रुपये इतका झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.

सोने-चांदीच्या किंमती तुम्हाला घरबसल्या पण जाणून घेता येईल. सोने-चांदीचे ताजे भाव जाणून घेता येईल. त्यात स्थानिक कर, इतर करांचा भर पडतो. त्यामुळे शहरानुसार किंमतीत तफावत दिसून येते. इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) हे भाव जाहीर करेल. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या सुट्या, शनिवारी आणि रविवार हे दिवस सोडून या किंमती जाहीर करण्यात येतात. ग्राहक 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन सर्व कॅरेटचे भाव जाणून घेऊ शकतात.