kshitijmagazine&news

Welcome to Kshitij World. You will find here worlds update and basic information of various things

२६ जुलैला येणार उत्कंठा वाढवणारा ‘गूगल आई’

मराठी चित्रपटाचे वेगळेपण पाहून दाक्षिणात्य दिग्दर्शक गोविंद वराह ‘गूगल आई’ हा चित्रपट मराठी प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहेत. येत्या २६ जुलैला प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाचा जबरदस्त टिझर काही दिवसांपूर्वीच प्रेक्षकांच्या भेटीला आला. टिझरची झलक पाहून प्रेक्षकांच्या मनात चित्रपटाविषयी औत्सुक्य निर्माण झाले असेल. तंत्रज्ञानाच्या मदतीने कुटुंबाला वाचवणाऱ्या एक लहानगीची ही कथा आहे. नुकतेच या चित्रपटातील ‘मन रंगलंय’ हे गाणे प्रदर्शित झाले. त्यामुळे हा चित्रपट कौटुंबिक आणि रहस्यमय आहे, याचा अंदाज येतोय. डॉलर्स मीडिया ॲण्ड एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेड आणि गेहिनी रेड्डी प्रस्तुत या चित्रपटात प्रणव रावराणे, प्राजक्ता गायकवाड, अश्विनी कुलकर्णी, सई रेवडीकर, माधव अभ्यंकर यांच्या प्रमुख भूमिका असून ‘गूगल आई’ची ची निर्मिती डॉलर्स दिवाकर रेड्डी यांनी केली आहे. तर गोविंद वराह यांनी दिग्दर्शनासहित कथा, पटकथा लेखनाची धुरा सांभाळली आहे.

चित्रपटाबद्दल दिग्दर्शक गोविंद वराह म्हणतात, “मराठी प्रेक्षक हा चोखंदळ आहे. त्याला कलेची उत्तम जाण आहे आणि म्हणूनच मला मराठीत एखादा चित्रपट करावा, असे वाटत होते. ‘गूगल आई’च्या माध्यमातून मी मराठी सिनेसृष्टीत पदार्पण करत आहे. मला खात्री आहे, मराठी प्रेक्षकवर्गाला हा चित्रपट नक्कीच आवडेल. चित्रपटात नावाजलेले चेहरे आहेत. त्यांच्यासोबत काम करतानाही मजा आली. मराठी इंडस्ट्री एखाद्या कुटुंबासाखी का आहे, याचा प्रत्यय मला हा चित्रपट करताना आला. आता प्रतीक्षा आहे, प्रेक्षकवर्ग ‘गूगल आई’ला कसे स्वीकारतात याची. क्षणोक्षणी उत्कंठा वाढवणारा हा चित्रपट आहे.”