kshitijmagazine&news

Welcome to Kshitij World. You will find here worlds update and basic information of various things

गुढीपाडवा २०२४ : ३० वर्षानंतर गुढीपाडव्याला दुर्लभ संयोग, धन-धान्याने भरभराटीचा काळ

मंगळवार ९ एप्रिल २०२४ रोजी गुढीपाडवा सण साजरा होत आहे. या वर्षी चैत्र शुक्ल प्रतिपदेपासून शालिवाहन शके १९४६ क्रोधीनाम नाव संवत्सर सुरू होत आहे. ज्योतिषशास्त्रानुसार ३० वर्षांनंतर गुढीपाडव्याला ग्रहांचा एक दुर्मिळ संयोग तयार होईल. या दिवशी शश राजयोग, अमृत सिद्धी योग आणि सर्व सिद्धी योग एकत्र येत आहेत. चला जाणून घेऊया या हिंदू नववर्षाच्या प्रारंभाने कोण-कोणत्या राशींचे नशीब बदलेल, कोणाला भाग्याची खास साथ लाभेल. हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे चैत्र शुद्ध प्रतिपदेला महाराष्ट्रात गुढीपाडवा साजरा केला जातो. शालिवाहन संवत्सराचा हा पहिला दिवस आहे. वेदांग ज्योतिष या ग्रंथात सांगितलेल्या साडेतीन मुहूर्तांपैकी हा एक मुहूर्त आहे. या दिवशी नवीन वस्तू खरेदी, व्यवसाय प्रारंभ, नव उपक्रमांचा प्रारंभ, सुवर्ण खरेदी इत्यादी गोष्टी केल्या जातात. दारी उभारलेली गुढी हे विजय आणि समृद्धीचे प्रतीक आहे असे मानले जाते.

मेष:

गुढीपाडव्याच्या दुर्लभ योग-संयोगाच्या या काळात मेष राशीच्या लोकांना भौतिक सुखे मिळतील. जोडीदाराच्या माध्यमातून आनंद आणि लाभ होऊ शकतो. नवीन वाहन खरेदी करण्याचा विचार करू शकता. जीवनातील अनेक समस्यांवर मात करू शकतात. बेरोजगारांना नोकरीची संधी मिळू शकते.

वृषभ:

गुढीपाडव्याच्या दुर्लभ योग-संयोगाच्या या काळात वृषभ राशीच्या लोकांना बुद्धिमत्तेचा फायदा होऊ शकतो. अपत्य होण्याची शक्यता आहे. तुमचे नशीब एका रात्रीत बदलण्याची संधी मिळू शकते. आर्थिक स्थिती चांगली राहील. परदेशात जाण्याची प्रक्रिया सुरू होईल. कोणाचा तरी पाठिंबा तुमच्यासाठी भाग्यदायक ठरेल.

मकर:

गुढीपाडव्याच्या दुर्लभ योग-संयोगाच्या या काळात प्रत्येक कामात नशीब तुमच्या बाजूने असू शकते. शत्रूपासून मुक्ती मिळवण्यासाठी हा कालावधी अधिक उपयुक्त ठरू शकतो. पालकांकडून सहकार्य मिळेल. पूर्वी केलेल्या कृतींचे चांगले परिणाम मिळू शकतात. जुना वाद मिटतील. तुम्हाला नवीन ऊर्जा जाणवेल. हा काळ लाभाच्या उत्तम संधीचा राहील.