अनेक दिवसांपासून इस्रायलमधील हमासचे हल्ले आणि त्याला प्रत्युत्तर म्हणून इस्रायलनं गाझा पट्टीत केलेल्या हवाई कारवाया या संपूर्ण जगात चर्चेचा विषय ठरत आहेत. आंतरराष्ट्रीय पातळीवर हे युद्ध चिंतेचा विषय ठरलं आहे. पण गुरुवारी इस्रायलच्या हवाई हल्ल्यात हमासचा म्होरक्या याह्या सिनवार ठार झाल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे या युद्धाला व हमासला मोठा झटका बसला आहे. आता हमासची पीछेहाट आणि पर्यायाने युद्ध संपुष्टात येण्याच्या दिशेने घडामोडी घडतील, असं मानलं जात आहे. पण त्याआधी इस्रायलच्या लष्करानं शेअर केलेला याह्या सिनवारच्या शेवटच्या क्षणांचा एक थरारक व्हिडीओ व्हायरल होऊ लागला आहे. या व्हिडीओमध्ये याह्या सिनवार गंभीर जखमी अवस्थेत दिसत आहे.

इस्रायलच्या लष्करानं शेअर केला व्हिडीओ

इस्रायलकडून गाझा पट्टीत गुरुवारी लष्करी कारवाई करण्यात आली. हे हल्ले हमासच्या तळांवर होत असल्याचा दावा इस्रायलकडून केला जातो. अशाच एका हवाई हल्ल्यात हमासचे तीन महत्त्वाचे सदस्य मारले गेल्याचा दावा देखील इस्रायलच्या लष्करानं केला आहे. त्यातच हमासचा म्होरक्या याह्या सिनवारही असल्याची माहिती देण्यात आली आहे. ‘कसाई’ म्हटल्या जाणाऱ्या याह्या सिनवारचा हल्ल्यात मृत्यू झाल्याचा व्हिडीओ इस्रायलच्या लष्करानं शेअर केला असून त्यात याह्या सिनवार एका हवाई हल्ल्यात उद्ध्वस्त झालेल्या घरात जखमी अवस्थेत बसल्याचं दिसत आहे.

इस्रायल लष्कराच्या अधिकृत एक्स हँडलवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून लष्कराच्या प्रवक्त्याने तो पोस्ट केला आहे. हा व्हिडीओ एका ड्रोनने चित्रीत करण्यात आला आहे. एका उद्ध्वस्त झालेल्या इमारतीची वरून घेतलेली दृश्य व्हिडीओच्या सुरुवातीला दिसत आहेत. नंतर हा ड्रोन कॅमेरा खाली उतरत इमारतीच्या एका छिन्नभिन्न झालेल्या घरात शिरतो. तिथे बॉम्बहल्ल्यामुळे घराचं झालेलं नुकसान सहज दिसून येत आहे. त्यातच धुळीच्या थरात एका सोफ्यावर हात तुटलेल्या अवस्थेत एक व्यक्ती बसलेली दिसत आहे. हाच तो ‘कसाई’ याह्या सिनवार!

नेमकं काय आहे व्हिडिओमध्ये ?

व्हिडीओत दिसणारी जखमी व्यक्ती याह्या सिनवार असल्याचं व्हिडीओमध्येच नावानिशी सांगण्यात आलं आहे. त्याचा उजवा हात तुटलेला असून तो सोफ्याच्या उजव्या बाजूच्या हँडरेस्टवर टेकलेला आहे. त्यातून रक्त सांडत आहे. त्याच्या डाव्या हातात एक लाकडी काठीसदृश्य वस्तू असून कॅमेरा जसा त्याच्या जवळ जातो, तसा याह्या कॅमेऱ्याच्या दिशेनं डाव्या हातातली वस्तू फेकत असल्याचं व्हिडीओत दिसत आहे. या व्हिडीओमध्ये एवढंच दिसत आहे.

याह्या सिनवारने आयुष्याची २२ वर्षे तुरुंगात घालवली

याह्या सिनवारने त्याच्या आयुष्याची २२ वर्षे तुरुंगात घालवली आहेत. १९८८ ते २०११ अशा प्रदीर्घा कालावधीत तो इस्रायलच्या तुरुंगात होता. त्यानंतर काही काळ त्याने अज्ञातवासात घालवला. त्यामुळे तो आणखी कट्टर झाला. तुरुंगात असताना त्याचा प्रभाव इतर कैद्यांवर होता. गैरवर्तन करणं, दादागिरी करणं, हेराफेरी करणं हे त्याच्या स्वभावात होतं. त्याच्याबाबत माहिती देणाऱ्या कैद्यांबाबत त्याने फक्त संशय आल्याने त्यांना शिक्षा देण्याचाही प्रयत्न केला.

२०१७ पासून हमासचा म्होरक्या म्हणून केलं काम

तुरुंगात असताना त्याने १६०० कैद्यांना उपोषण करायला लावलं होतं. हिब्रू या भाषेत त्याने प्राविण्य मिळवलं आहे. त्याची तुरुंगातून सुटका झाल्यानंतर सिनवारला गाझा पट्टीतल्या हमास या संघटनेच्या राजकीय सदस्यपदी निवडण्यात आलं होतं. २०१५ मध्ये सिनवारचं नाव जागतिक दहशतवाद्यांच्या यादीत आलं. २०१७ पासून त्याने हमासचा म्होरक्या म्हणून काम केलं आहे. याह्या सिनवारला २०१५ मध्ये आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्यात आलं.

या घटनेच्या काही दिवस आधीच याह्याने फ्रान्सची संपती गोठवली होती. आंतरराष्ट्रीय दहशतवाद्यांच्या यादीत नाव आलं तरीही त्याचं क्रौर्य कमी झालं नाही. याह्या ८० च्या दशकाच्या शेवटी हमासमध्ये सहभागी जाला. तो तुरुंगात असताना त्याने त्याचं नेटवर्क तयार केलं होतं. इस्रायलचे दोन सैनिक आणि चार पॅलेस्टाईनी नागरिकांची हत्या या गुन्ह्यांखाली त्याला २२ वर्षांची शिक्षा झाली होती. तुरुंगात त्याने स्वतःचं नेटवर्क तयार केलं जेव्हा तो तुरुंगातून बाहेर आला तेव्हा तो क्रूरकर्मा बनला होता.

याह्या सिनवारला कसाई असं का म्हटलं जायचं?

याह्या सिनवारला अनेक नावांनी ओळखलं जातं. कुणी त्याला हमासचा ओसामा बिन लादेन म्हणतात.म्हणत तर कुणी खान युनिसचा जल्लाद ! याह्या सिनवार इतका क्रूर होता की त्याने अनेक पॅलेस्टाईनी नागरिकांना तडफडवून मारलं आहे. त्यामुळेच त्याला कसाई असं संबोधलं जात होतं. तर इस्रायलकडून त्याची तुलना हिटलरशी करण्यात येत होती. त्याने या हत्या लहान मुलांसमोर केल्या होत्या. तसंच लहान मुलांना तो बंदुक कशी चालवायची हे शिकवत होता. त्याच्या प्रचंड क्रौर्यामुळे त्याला कसाई हे नाव पडलं. इस्रायल डिफेन्स फोर्सेसचे प्रवक्ते लेफ्टनंट कर्नल रिजर्ड हेचट यांनी त्याला क्रौर्याचा भेसूर चेहरा असं म्हटलं होतं. तसंच चालता बोलता पण मेलेला माणूस त्याला काहीही दयामाया नाही असंही त्याचं वर्णन करण्यात आलं होतं. सिनेवारचा जन्म १९६२ मध्ये गाझाच्या एका शरणार्थी शिबीरात झाला होता. त्याला खान युनिसचा कसाई असंही म्हटलं जातं कारण तो खुलेआम हत्या करण्यासाठी कुप्रसिद्ध होता.

याह्या सिनवारचं क्रौर्य फारच भयंकर होतं. एकदा त्याने एका इस्रायलसाठी हेरगिरी करण्याच्या संशय असलेल्या एका माणसाला जिवंत पुरलं होतं. कबरीचा खड्डा चमच्यांनी खोदण्याची ऑर्डर द्यायचा. या प्रकरणात त्याने ज्याला मारलं त्याच्या भावालाच चमच्यांच्या सहाय्याने त्याची कबर खणायला लावली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *