kshitijmagazine&news

Welcome to Kshitij World. You will find here worlds update and basic information of various things

नराधमाच्या बोलण्यात फसली अन् घात झाला; पुण्यात शिवशाही बसमध्ये तरुणीवर बलात्कार !

पुण्यातील स्वारगेट बस स्टँडवरील उभ्या असलेल्या शिवशाही बसमध्ये पहाटे 5.30 च्या दरम्यान एका 26 वर्षीय तरुणीवर बलात्कार झाल्याच्या घटनेनंतर महाराष्ट्र ढवळून निघाला आहे. पुण्यातील अत्यंत वर्दळीच्या स्वारगेट बस स्टँडवर एक व्यक्ती येते आणि तरुणीवर अतिप्रसंग करुन निघून जाते. या प्रकरणानंतर अनेक सवाल उपस्थित झाले आहेत. ती बस का लॉक करण्यात आली नाही? कोणीही तिच्या मदतीला का आलं नाही? असे अनेक सवाल उपस्थित केले जात आहे.

स्वारगेट स्टँडवर तरुणीसोबत काय घडलं?

पीडित तरुणी पहाटेच्या वेळी स्वारगेट बस स्टँडवर आली होती. पीडित तरुणी पुण्याहून फलटणला जात होती. ती बुधवारी पहाटे स्वारगेट बसस्थानकावर थांबली होती. तेव्हा एका अनोळखी व्यक्तीने तिची बस दुसऱ्या ठिकाणी थांबल्याचं सांगितलं. पण तरुणीने त्याच्यावर विश्वास ठेवला नाही. त्यावर तरुणीने तिच्या एकटेपणाचा फायदा घेत तिला विश्वासात घेतले. त्यानंतर तो तिला जवळच उभ्या असलेल्या एका शिवशाही बसच्या दिशेने नेले. बसमध्ये अंधार असल्याने सुरुवातीला तरुणी आत गेली नाही. मात्र नेले. मात्र प्रवासी झोपले असल्याने दिवे बंद असल्याचं आरोपीने तिला सांगितलं. हवं तर टॉर्च लावून बघ असंही आरोपीने सांगितलं. यानंतर पीडित तरुणी आत शिरली. यानंतर लागलीच आरोपी बसमध्ये शिरला आणि बस आतून बंद केली. शिवशाही बसमध्येच त्याने तिच्यावर पाशवी बलात्कार केला व तेथून पळ काढला. या घटनेमुळे तरुणी हादरली होती. ती तिथून फलटणच्या बसमध्ये बसली. ही बस स्वारगेटहून निघालीही होती. दरम्यानच्या काळात तरुणीने आपल्या मित्राला फोनवरून ही घटना सांगितली. त्यानंतर मित्राने तिला तत्काळ पोलिसांकडे जाण्याचा सल्ला दिला. त्यानंतर तरुणीने स्वारगेट पोलीस ठाणे गाठून आपबिती कथन केली. पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात आरोपीविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करत घटनास्थळी जाऊन तपास सुरू केला आहे.

कोण आहे आरोपी?

दत्तात्रय रामदास गाडे असं आरोपीचं नाव आहे. त्याच्यावर शिक्रापूर व शिरूर पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद आहे. सध्या तो फरार आहे. त्याच्या मुसक्या आवळण्यासाठी पोलिसांचं पथक त्याच्या मागावर निघाले आहेत. त्याला लवकरच अटक करण्याचा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे. स्वारगेट बसस्थानक शहरातील एक सुरक्षित बसस्थानक समजले जाते. तिथे 24 तास प्रवाशांची वर्दळ सुरू असते. त्यानंतरही तिथे ही घटना घडल्यामुळे महिला सुरक्षेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. आरोपी दत्तात्रय गाडे हा एक सराईत गुन्हेगार आहे. तो मूळचा शिरूरचा आहे. त्याच्यावर शिक्रापूर व शिरूर पोलीस ठाण्यात चेन स्नॅचिंग सारखे गुन्हे नोंद आहेत. त्याने स्वारगेट बसस्थानकावर तरुणीला चुकीची माहिती देऊन डेपोत थांबलेल्या शिवशाहीमध्ये नेले. तिथे तिच्यावर अत्याचार केला. हा आरोपी रेकॉर्डवरील गुन्हेगार असला तरी स्वारगेट बसस्टँडसारख्या वर्दळीच्या ठिकाणी घडलेली ही घटना कुणालाच कशी कळली नाही? असा सवाल उपस्थित होत आहे.

या प्रकरणात पुणे पोलिसांनी आरोपीच्या भावाला ताब्यात घेतलं आहे. आरोपीचा तपास करण्यासाठी आरोपीचा भाऊ पोलिसांच्या ताब्यात असून आठ टीमकडून आरोपीचा शोध सुरू आहे.