एतक्या दिवस महाराष्ट्राच्या निवडणुका कधी जाहीर होणार? ही तारीख गुलदस्त्यात होती. आज महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी पत्रकार परिषदेत निवडणुकीची तारीख जाहीर केली. महाराष्ट्रात एकाच टप्प्यात निवडणुका होणार आहेत. 20 नोव्हेंबर रोजी निवडणुका होणार आहेत. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल 23 नोव्हेंबरला लागणार आहे. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी ही माहिती दिली आहे. यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या अयोध्या पोळ यांनी ‘एक्स’वर पोस्ट केली आहे.

काय आहे अयोध्या पोळ यांची पोस्ट ?

“मी उद्धव बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतो की….” साहेब वरील शपथ ऐकण्यासाठी तुमच्या या लेकीसह सर्व #शिवसैनिक सज्ज आहेत आणि तुम्हाला #मुख्यमंत्री करण्यासाठी आम्ही जिवाचं रान करुन मेहनत करु साहेब…. अशी पोस्ट अयोध्या पोळ यांनी ‘एक्स’वर केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *