महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षेचे वेळापत्रक जाहीर झालं आहे. 6 जुलै 2024 रोजी ही परीक्षा आयोजित करण्यात आली आहे. शासनाकडून प्राप्त सुधारित मागणीपत्रानुसार या परीक्षेमधून भरावयाच्या विविध संवर्गातील एकूण 524 पदांचा सुधारित सविस्तर तपशील आयोगाच्या संकेतस्थळावर देण्यात आले असल्याचे आयोगाने कळविले आहे.

या परिक्षेसाठी दिनांक 29 डिसेंबर, 2023 रोजी एकूण 274 रिक्त पदांकरीता जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. जाहिरातीनुसार ही परीक्षा दिनांक 28 एप्रिल, 2024 रोजी घेण्याचे नियोजित होते. महाराष्ट्र राज्यातील सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गाकरीता आरक्षण अधिनियम 2024, 26 फेब्रुवारी, 2024 नुसार राज्याच्या नियंत्रणाखालील पदांवरील नियुक्तीकरिता सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गासाठी आरक्षणाची तरतूद विहित करण्यात आली आहे. या अधिनियमातील तरतुदी शासन निर्णय,27 फेब्रुवारी, 2024 नुसार विषयांकित संवर्गाच्या विज्ञापित जाहिरातीसाठी लागू आहेत. प्रस्तुत प्रकरणी सामाजिक व शैक्षणिक शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गासाठी आरक्षण निश्चिती करून सुधारित मागणीपत्र पाठविण्याबाबत शासनास कळविण्यात आले. यास्तव, आयोगाच्या दिनांक 21 मार्च, 2024 रोजीच्या प्रसिद्धीपत्रकाद्वारे प्रस्तुत परीक्षा पुढे ढकलण्यात आली असल्याचे जाहीर करण्यात आले होते.

शासनाकडून प्राप्त सुधारित मागणीपत्रानुसार महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा-2024 या परीक्षेमधून भरावयाच्या विविध संवर्गातील एकूण 524 पदांचा सुधारित तपशील खालीलप्रमाणे आहे.

अर्ज सादर करण्याचा कालावधीदिनांक 09 मे, 2024 रोजी 14.00 ते दिनांक 24 मे, 2024 रोजी 23:59 पर्यंत आहे.

ऑनलाईन पद्धतीने विहित परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक 24 मे, 2024 रोजी 23:59 पर्यंत*

भारतीय स्टेट बॅंकेमध्ये चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरण्यासाठी चलनाची प्रत घेण्याचा दिनांक 26 मे, 2024 रोजी 23:59 पर्यंत आहे.

चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक 27 मे, 2024 रोजी आहे.

पदे व संख्या

(एक) राज्य सेवा परीक्षा :- एकुण पदे 431

(1) उप जिल्हाधिकारी, गट-अ (एकूण 07 पदे)
(2) सहाय्यक राज्य कर आयुक्त, गट-अ (एकूण 116 पदे)
(3) गट विकास अधिकारी (उच्च श्रेणी),गट-अ (एकूण 52 पदे)
(4) सहायक संचालक, महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा, गट-अ (एकूण 43 पदे)
(5) सहायक आयुक्त/ प्रकल्प अधिकारी (एकात्मिक अदिवासी विकास प्रकल्प)(श्रेणी दोन), गट-अ (एकूण 03 पदे)
(6) उद्योग उप संचालक (तांत्रिक), गट-अ (एकूण 07 पदे)
(6) उद्योग उप संचालक (तांत्रिक), गट-अ (एकूण 07 पदे)
(7) सहायक कामगार आयुक्त, गट – अ (एकूण 02 पदे),
(8) सहायक आयुक्त, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता, गट – अ (एकूण 01 पद),
(9) मंत्रालयीन विभागातील कक्ष अधिकारी, गट-ब (एकूण 19 पदे),
(10) सहायक गट विकास अधिकारी, गट-ब (एकूण 25 पदे),
(11) सहायक आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क, गट-ब (एकूण 1 पदे),
(12) उप अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, गट-ब (एकूण 5 पदे),
(13) कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता-मार्गदर्शन अधिकारी, गट-ब (एकूण 07 पदे),
(14) सरकारी कामगार अधिकारी, गट – ब (एकूण 04 पदे),
(15)सहायक प्रकल्प अधिकारी/ सांख्यिकी अधिकारी/ प्रशासकीय अधिकारी/ संशोधन अधिकारी / गृहप्रमुख /प्रबंधक, गट-ब (एकूण 04 पदे),
(16) उद्योग अधिकारी (तांत्रिक), गट-ब (एकूण 7 पदे),
(17) सहायक प्रकल्प अधिकारी (शिक्षण), आदिवासी विकास आयुक्तालय, गट-ब (एकूण 52 पदे),
(18) निरीक्षण अधिकारी (पुरवठा), गट-ब (एकूण 76 पदे),(दोन )

(दोन) महाराष्ट्र वनसेवा परीक्षा – महसूल व वन विभाग (एकूण48 पदे)

(1) सहायक वनसंरक्षक, गट-अ, (एकूण 32 पदे) ,(2) वनक्षेत्रपाल, गट-ब, (एकूण 16 पदे)

(तीन ) महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा परीक्षा – मृद व जल संधारण विभाग (एकूण 45 पदे)

(1) उपविभागीय जलसंधारण अधिकारी (स्थापत्य), गट-अ, (एकूण 23 पदे)
(2) जलसंधारण अधिकारी (स्थापत्य), गट-ब, (एकूण 22 पदे).