भारतातील आघाडीच्या उद्योगपतींपैकी एक आणि टाटा सन्सचे अध्यक्ष रतन टाटा यांचे वयाच्या काल (बुधवारी) ८६ व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या निधनाच्या बातमीने देशभरात शोककळा पसरली आहे. आता त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी जनसागर लोटला आहे. यावेळी त्याच्या खास श्वानांनी देखील त्यांना श्रद्धांजली वाहिली.’पद्मविभूषण’ पुरस्काराने सन्मानित 86 वर्षीय टाटा यांचे बुधवारी रात्री 11.30 वाजता मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते.रतन टाटा यांचे तरुण मित्र आणि त्यांच्या आयुष्याच्या शेवटच्या काही वर्षातील सहकारी शंतनू नायडू यांनी लिंकडिनवर पोस्ट लिहून दुःख व्यक्त केले आहे.
रतन टाटा यांचे तरुण मित्र आणि त्यांच्या आयुष्याच्या शेवटच्या काही वर्षातील सहकारी शंतनू नायडू यांनी लिंकडिनवर पोस्ट लिहून दुःख व्यक्त केले आहे. ते लिहितात, “ही मैत्री तुटल्यामुळे निर्माण झालेली पोकळी भरुन काढण्याचा प्रयत्न मी आयुष्यभर करेन. प्रेमासाठी दुःखाची किंमत मोजावी लागते. माझ्या प्रिय दीपस्तंभाला निरोप….”
दरम्यान, टाटा सन्सचे अध्यक्ष एन चंद्रशेखरन यांनी बुधवारी (9 ऑक्टोबर) मध्यरात्री जारी केलेल्या निवेदनात म्हटलं की, “आम्ही रतन नवल टाटा यांना निरोप देत आहोत, त्यांचं नेतृत्व खरोखर असामान्य होतं. त्यांच्या अतुलनीय योगदानामुळे केवळ टाटा समूहच नाही तर आपल्या राष्ट्राची रचना देखील घडली आहे.”
या निवेदनात पुढे म्हटलं आहे की, “टाटा समूहासाठी रतन टाटा हे एका अध्यक्षापेक्षा अधिक होते. माझ्यासाठी ते एक मार्गदर्शक आणि मित्र होते. त्यांनी स्वतःच उदाहरण जगासमोर ठेवून इतरांना प्रेरणा दिली. त्यांच्या नेतृत्वात टाटा समूहाने नेहमी उत्कृष्टता, सचोटी आणि नाविन्यपूर्णतेसाठी वचनबद्धता दाखवली. समूहाच्या नैतिकतेशी कुठेही तडजोड न करता टाटा समूहाने जागतिक स्तरावर ठसा उमटवला.”
रतन टाटांनी केलेल्यासमाजसेवेची दखल या निवेदनात घेण्यात आली आहे, त्यात म्हटलं आहे की, “शिक्षणापासून ते आरोग्यसेवेपर्यंत, त्यांच्या पुढाकारांनी खोलवर रुजलेली छाप सोडली आहे ज्याचा फायदा येणाऱ्या पिढ्यांना होईल”.