kshitijmagazine&news

Welcome to Kshitij World. You will find here worlds update and basic information of various things

इस्रायलच्या जहाजावर इराणच्या नौदलाची मोठी कारवाई

इस्रायल आणि इराण यांच्यात युद्धसदृश परिस्थिती आहे. त्यातच इराणने यूएईहून भारतात येणारे एमएससी एरिस हे जहाज ताब्यात घेतले आहे. इराणच्या तसनीम न्यूज एजन्सीने हे वृत्त दिले आहे. इराणच्या नौदलाच्या कमांडोंनी इस्रायलशी संबंध असलेलं भारतात येणारे जहाज ताब्यात घेतले आहे. हेलिकॉप्टरच्या मदतीने हे कमांडो जहाजावर उतरले. त्यानंतर त्यांनी जहाज ताब्यात घेतलं. जहाज ताब्यात घेतल्याचा व्हिडिओ देखील समोर आला आहे. या जहाजावर पोर्तुगालचा ध्वज आहे. लंडनस्थित कंपनी झोडियाक मेरिटाइमशी हे जहाज संबंधित आहे. Zodiac Group हा इस्रायली अब्जाधीश Eyal Ofer यांच्या मालकीचा आहे. पण या जहाजात असलेले चालक दल भारतीय असून त्यांची संख्या सुमारे १७ असल्याचे सांगण्यात येत आहे.

Zodiac Group ने या संपूर्ण घटनेवर कुठलीही प्रतिक्रिया दिलेली नाही. MSC Aris हे जहाज शुक्रवारी दुबईच्या किनाऱ्याजवळ शेवटचे पाहिले गेले होते. त्यानंतर ते दिसले नाही. होर्मुझच्या सामुद्रधुनीकडे जात असताना त्याला ताब्यात घेण्यात आले आहे. जहाजाने त्याचा ट्रॅकिंग डेटा बंद केला होता, कारण इस्त्रायली जहाजांसाठी जे या परिसरातून जातात त्यांच्यासाठी हे सामान्य आहे. इराणी लष्कराचे कमांडो या जहाजावर उतरले आहेत.

एक कमांडो इतर कमांडोना कव्हर देत होते. हेलिकॉप्टरचा वापर करत हे कमांडो जहाजावर उतरले. इराणच्या निमलष्करी दल रिव्होल्युशनरी गार्डकडून या हेलिकॉप्टरचा वापर केला जात आहे, ज्यांनी यापूर्वीही जहाजांवर हल्ले केले आहेत. इराण आणि इस्रायलमध्ये युद्धसदृश परिस्थिती असताना इराणच्या नौदलाने ही कारवाई केली आहे. इराणच्या हल्ल्याचा धोका लक्षात घेऊन अमेरिकेने या भागात मोठ्या प्रमाणावर युद्धनौका तैनात केल्या आहेत. अमेरिकेने इस्रायलला मदत केल्यास त्यालाही लक्ष्य केले जाईल, असे इराणने म्हटले आहे.